शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वणीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआय पर्यवेक्षकाचा मृत्यू

By admin | Updated: January 14, 2015 23:15 IST

तालुक्यातील आबई फाटा येथील साई जिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआयचे (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडीया) पर्यवेक्षक नरेंद्रकुमार रामप्रसाद रावत यांचा मृत्यू झाला.

वणी : तालुक्यातील आबई फाटा येथील साई जिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआयचे (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडीया) पर्यवेक्षक नरेंद्रकुमार रामप्रसाद रावत यांचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.तालुक्यातील आबई फाटा येथे साई जिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग जीन आहे. या जिनींगमध्ये दररोज शेकडो क्विंटल कापूस खरेदी केला जातो. याच जिनींगमध्ये सीसीआयतर्फेही कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयचे पर्यवेक्षक म्हणून तेथे मूळ उत्तरप्रदेशातील प्रतापदेहड येथील रहिवासी नरेंदक्रुमार रामप्रसाद रावत (२१) कार्यरत होते. सोमवारी १२ जानेवारीला त्यांची रात्रपाळीत ड्युटी होती. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते कामावर गेले होते. त्यांची ड्युटी मंगळवारी सकाळी संपणार होती. मंगळवारी सकाळी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिनींगमधील कापसाच्या एका गंजीखाली त्यांचा मृतदेहच आढळला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत शिरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. जिनींगमधून कापसाच्या गंजीतून प्रेसिंगसाठी कापूस जातो. अशाच एका गंजीजवळ नरेंद्रकुमार कदाचित पहुडले असावे, असा कयास वर्तविण्यात येत आहे. दरम्यान त्यांना झोप लागली असावी आणि प्रेसिंगसाठी कापूस जात असताना त्यांच्या अंगावर कापसाची गंजी खचली असावी, असाही कयास वर्तविण्यात येत आहे. कापसाच्या त्या गंजीखाली दबून गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. (कार्यालय प्रतिनिधी)