शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

जनावरांचे मांस नेणारा ट्रक पकडला

By admin | Updated: September 28, 2016 00:54 IST

जनावरांचे मांस वाहून नेत असलेला ट्रक दारव्हा पोलिसांनी २६ सप्टेंबरचे रात्री १० वाजताचे दरम्यान पिंपळखुटा येथे पकडला.

चार जण अटकेत : पिंपळखुटातील घटनादारव्हा : जनावरांचे मांस वाहून नेत असलेला ट्रक दारव्हा पोलिसांनी २६ सप्टेंबरचे रात्री १० वाजताचे दरम्यान पिंपळखुटा येथे पकडला. यासोबत असलेली स्विफ्ट कारसह चार जणांना अटक केली तर एक जण फरार झाला आहे. नागपूर येथून ट्रक क्र.एम.एच.४०/वाय-३७९८ हा जनावरांचे मांस ोरून वाहू नेत असताना दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथे या ट्रकची एका मालवाहू वाहनाला कट लागल्याने गावकऱ्यांनी ट्रक अडविला असता ट्रकात मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावकऱ्यांनी याबाबत दारव्हा पोलिसांना याची माहिती दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी या ट्रकसोबत एक स्विफ्ट कारसुद्धा होती. हे मांस नागपूरवरून चोरट्या मार्गाने कर्नाटकमधील बिदर येथे जात असताना पकडल्यात आले. या बाबतची तक्रार भाऊसिंग भीमराव चव्हाण रा.पिंपटखुटा यांनी दारव्हा पोलिसात दिली. यावरून आरोपी मो.अक्रम शेख इब्राहीम, मो.सादिक मो.सलीम (२८), शेख अशफाक शेख कदीर (३४) ट्रकचालक भीमराव दशरथ गजभिये रा.पाचपावली नागपूर यांना अटक केली, तर स्विफ्ट कारचा चालक शेख वहीद शेख कासम हा कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला. ट्रकात एकूण सात टन मांसासह ट्रक व कार असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी हत्त्या कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पुढील तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम यांचे मार्गदर्शनात पीएसआय गावंडे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)