शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीतील कामांची वाताहत

By admin | Updated: February 4, 2016 02:29 IST

दलित वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यातील २२ गावात सिमेंट रस्ते करण्यात आले.

निकृष्ट रस्ते : माळेगावच्या नागरिकांचे उपोषणमहागाव : दलित वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यातील २२ गावात सिमेंट रस्ते करण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ३४ लाख रुपयाचा खर्च करण्यात आला. मात्र अनेक गावात दलित वस्त्यांना विकास कामापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी निकृष्ट कामे करण्यात आल्याचा अरोप आहे. तर माळेगाव येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.सामाजिक न्याय विभागच्यावतीने मिळालेल्या या निधीतून सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली. २१ नोव्हेंबर २०१५ च्या दरम्यान या कामाच्या भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. तीन लाखांच्या वरच्या कामाचे ई-टेंडर आवश्यक असल्याने २ लाख ९० हजाराचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यामुळे सदर काम थेट कार्यकर्त्यांना देता आले. या कामाचे वाटप फुलसावंगीमधून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे टक्कवारीचे ग्रहण लागले. त्यातून कामात दर्जा राहिला नाही. या कामाची नामधारी एजंसी संबंधित ग्रामपंचायत असली तरी अलिखित कारारातून ही कामे आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनीच केली असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारीच सांगत आहेत. एजंसी ग्रामपंचायत असून पैसे काढण्याचे अधिकार ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे माळेगाव, फुलसावंगी, राजुरा अन्य गावच्या कामाविषयी तक्रारी आहे. माळेगाव येथील विलास पाईकराव, दीपक राठोड या ग्रामपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांनी महागाव पंचायत समिती कार्यालयासमोर चार दिवस आमरण उपोषण करून या रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्याची माणगी केली आहे. रामेश्वर पवार, अमरसिंग राठोड यांचे साखळी उपोषण सुरू आहे. फुलसावंगी, राजुरा येथील कामात दर्जाच राहिला नाही. त्यामुळे या दोनही ठिकाणचे काम गावकऱ्यांनी थांबले होते. अशाच तक्रारी कमी अधिक प्रमाणात अन्य दलित वस्तीच्या सुरू असलेल्या कामाबाबत आहेत. (शहर प्रतिनिधी)