शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनी मंत्रालया’ची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:25 IST

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची राजकीय वाताहत झाली आहे. आधीच तीन पक्ष व अपक्षाचे सरकार आणि त्यात अभ्यासू व अनुभवी सदस्यांची प्रचंड वाणवा असल्याने

ठळक मुद्देअभ्यासू-अनुभवाचा अभाव : प्रशासन शिरजोर, सभापती केवळ खात्यांपुरते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची राजकीय वाताहत झाली आहे. आधीच तीन पक्ष व अपक्षाचे सरकार आणि त्यात अभ्यासू व अनुभवी सदस्यांची प्रचंड वाणवा असल्याने प्रशासन पदाधिकाऱ्यांवर शिरजोर झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. पदाधिकारी व सदस्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अधिकारी वर्ग त्यांना नियम-कायद्यांचा बाऊ करून फाईलीतच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सभापती मंडळी संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्याऐवजी आपल्या खात्यापुरतेच काम करीत असल्याने आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली. नैसर्गिकरित्या ही युती-आघाडी सुरूवातीपासून कुणालाच रूचली नाही. मात्र सत्तेपेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नसते, या भावनेतून एकमेकांना सदोदित पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आले. त्यातून पदाधिकाºयांमधील अंतर्गत कुरबुरीतून प्रशासन दरदिवशी वरचढ होऊ लागले. त्यातच सीईओंच्या पारदर्शक प्रशासनाच्या दाव्याने सर्वांचीच बोलती बंद झाली. त्यामुळे आता सर्व पुन्हा एकवटले. त्याचा प्रत्यय सर्वसाधारण सभेत आला. शिवसेना सदस्यांच्या दबावाला अध्यक्ष बळी पडल्या अन् सभा तहकूब करीत त्यांनी सत्ताधाºयांचे विरोधकांना सहकार्य असल्याचे एकप्रकारे अधोरेखित केले. यातून जिल्हा परिषदेत राजकीय कलगितुरा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.बदली-समायोजनावरच भर, विकास कामे ठरताहेत दुय्यमअल्प पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. राम देवसरकर यांच्यासह महागावच्या सभापतींनी हाच धागा पकडून सर्वसाधारण सभेत सभा सुरळीत चालू देण्याचे साकडे घातले. मात्र शिवसेना सदस्यांना यापेक्षा कोण अधिकारी रजेवर आहे, सीईओंचा चार्ज कुणाला दिला, यातच जादा रस दिसला. पाणीटंचाईसह विकास कामांचा त्यांना विसर पडल्याचे दिसून आले. त्यांनी सभेतून बहिर्गमन केले. त्यात अध्यक्षांनी शिवसेनेसह भाजपाचे सदस्य बाहेर पडल्याने सभा तहकूब करावी लागल्याचे सांगितले, तर भाजपा गटनेत्या मंगला पावडे यांनी काँग्रेसचेच सदस्य बाहेर गेल्याने सभा तहकूब झाल्याचा दावा केला. यामुळे सत्ताधाºयांमधील दुरावा पुन्हा स्पष्ट झाला. या सर्व कलगितुºयात जिल्ह्यातील विकास कामे मात्र बाजूला पडली, हेच खरे.