शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची जात पडताळणी आता तालुक्यातच

By admin | Updated: August 17, 2016 01:22 IST

शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात विशेष शिबिर आयोजित केले होते.

तारखेतही बदल : सर्व संघटनांच्या दबावानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचा दिलासा यवतमाळ : शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात विशेष शिबिर आयोजित केले होते. मात्र, सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध झाल्यानंतर आता हे शिबिर १७ ऐवजी शनिवारी २० आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शिबिर यवतमाळऐवजी तालुकापातळीवरच घेण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. बिंदू नामावलीसाठी मागास प्रवर्गातून नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्वच म्हणजे आठ हजार शिक्षकांना त्यासाठी यवतमाळात बोलावण्यात आले. मात्र, सलग सुट्यांच्या हंगामात हे शिबिर नको, म्हणत शिक्षक संघटनांनी विरोध केला. ज्या दिवशी शिबिराचा आदेश निघाला, त्याच दिवशी म्हणजे १४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवरून संपर्क साधला. साहेबराव पवार, दिवाकर राऊत, ज्ञानेश्वर नाकाडे, राजू सूर्यवंशी, किरण मानकर, गजानन देऊळकर, पुरुषोत्तम ठोकळ, रमाकांत मोहरकर, राजेंद्र जोगमोडे, कैकाडे आदींचा यात समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेत तपासणी शिबिराची तारीख बदलण्याची मागणी केली. तसेच जिल्हा पातळीवर एकाच दिवशी आठ हजार शिक्षकांचे शिबिर घेतल्यास नियोजन कोलमडण्याची भीतीही व्यक्त केली. त्याची दखल घेत सीईओंनी २१ आॅगस्ट रोजी प्रमाणपत्र तपासणीचे आश्वासन दिले. मात्र, याच दिवशी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अमरावती येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना जातप्रमाणपत्र पडताळणीला उपस्थित राहणे अशक्य असल्याचे सीईओ आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. संघटनांचा दबाव बघता अखेर २० आॅगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, आता हे शिबिर सोळाही पंचायत समिती स्तरावरच घेण्यात येणार आहे. त्यासाठी यवतमाळातून कक्ष अधिकारी पाठविण्यात येणार आहे. शिवाय, ज्यांना २० आॅगस्ट रोजीच्या तालुका पातळीवरील शिबिरातही उपस्थित राहणे अशक्य होईल, त्यांनी नंतर यवतमाळात येऊन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभाही देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)