शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत कॅश व्हॅनचा कंत्राट तीन कोटी रुपयांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:27 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांना कॅश पोहोचविण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या व्हॅनचा तीन वर्षाचा कंत्राट तीन कोटी रुपयांचा आहे. या कंत्राटाची मुदत संपत असल्याने जुन्याच एजंसीला नवा कंत्राट मिळावा यासाठी आतापासूनच बँकेत विशिष्ट संचालकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.

ठळक मुद्देमुदत संपतेय : नव्या निविदांसाठी धडपड, संचालकांचा ‘इन्टरेस्ट’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांना कॅश पोहोचविण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या व्हॅनचा तीन वर्षाचा कंत्राट तीन कोटी रुपयांचा आहे. या कंत्राटाची मुदत संपत असल्याने जुन्याच एजंसीला नवा कंत्राट मिळावा यासाठी आतापासूनच बँकेत विशिष्ट संचालकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९४ शाखा आहेत. या शाखांमध्ये जिल्हा मुख्यालयातून कॅश पोहोचविणे व तेथील कॅश मुख्यालयात आणणे यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच व्हॅन भाड्याने घेण्यात आल्या होत्या. त्याचा कंत्राट तीन वर्षांसाठी देण्यात आला होता. वणी व पुसद विभागाला प्रत्येकी एक तर यवतमाळ विभागाला तीन व्हॅन आहेत. या प्रत्येक व्हॅनमध्ये चालक, सिक्युरीटी गार्ड व बँकेचा एक कर्मचारी असतो. या पाच व्हॅनच्या मासिक खर्चावर साडेसात लाख रुपये बँकेच्या तिजोरीतून जातात. मुळात या व्हॅनला देण्यात आलेला प्रति किलोमीटर सरासरी २५ रुपयांचा दर हाच अधिक असल्याचे बँकेच्या वर्तुळातून सांगितले जाते. तीन वर्षांपूर्वी एका संचालकाने पुढाकार घेऊन कॅश व्हॅनचे हे ‘दुकान’ मांडले. रेकॉर्डवर दुसराच व्यक्ती कॅश व्हॅनचा मालक आहे. पुढील महिन्यात या व्हॅनचा तीन वर्षांचा कंत्राट संपतो आहे. त्यामुळे आतापासूनच बँकेत विशिष्ट संचालकांमध्ये लगबग पहायला मिळते आहे. एक तर आहे त्यालाच मुदतवाढ द्यावी किंवा नव्याने निविदा काढल्यास जुन्याच व्यक्तीला कंत्राट मिळेल या दृष्टीने व्युहरचना करावी, असे बँकेतील नियोजन असल्याचे सांगितले जाते.बँकेचे राजकीय रिमोट आपल्याच हाती असल्याने त्या संचालकासाठी आपल्या सोईने सर्वकाही करून घेणे कठीण नाही. नोकरभरतीसाठी धडपडणाऱ्या त्या संचालकाकरिता कॅश व्हॅनचा कंत्राट पुन्हा मिळविणे क्षुल्लक बाब असल्याचे सांगितले जाते. आता तर प्रति किलोमीटर दरसुद्धा आणखी वाढवून घेण्याचे प्रयत्न आहे. कॅश व्हॅनवर तीन वर्षात तीन कोटी रुपये खर्च करण्याऐवजी बँकेला स्वत:च्या स्तरावर कायमस्वरूपी ही यंत्रणा उभारणे शक्य नाही काय? या मुद्यावर सध्या बँकेचे काही संचालक व यंत्रणेत खल पहायला मिळतो आहे.सहकारी बँकेच्या ७२ शाखा अजूनही भाड्याच्याच इमारतीतजिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला सलग दहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला. मात्र त्यांना या काळात आपल्या संपूर्ण शाखाही स्वत:च्या इमारतीत नेता आल्या नाही. आजच्या घडीला ९४ पैकी केवळ २२ शाखा स्वत:च्या इमारतीत आहे. उर्वरित शाखा अजूनही भाड्याच्या (किरायाच्या) इमारतीत आहेत. या शाखांवर कुठेही सायरनची व्यवस्था नाही. मात्र बहुतांश ठिकाणी सिक्युरीटी गार्ड व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याचे सांगण्यात आले. भाड्याच्या इमारतीतील शाखा हेच जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचे गेल्या दहा वर्षातील अपयश मानले जाते. यावरून या संचालकांनी बँकेची खरोखरच किती प्रगती केली, हे स्पष्ट होते.

टॅग्स :bankबँक