शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

नगदीच्या तगाद्याने कास्तकारांची झाली कोंडी

By admin | Updated: July 2, 2015 02:50 IST

दरवर्षी उधारीवर बियाणे खरेदी करून पेरणी करणाऱ्या कास्तकारांची यंदा चांगलीच कोंडी झाली आहे.

कृषी केंद्रांनी केली उधारी बंद : गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाने कृषी केंद्रचालक धास्तावलेयवतमाळ : दरवर्षी उधारीवर बियाणे खरेदी करून पेरणी करणाऱ्या कास्तकारांची यंदा चांगलीच कोंडी झाली आहे. बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास कृषीकेंद्रचालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे कृषीकेंद्र चालक उधारीत बियाणे देण्यास सपशेल नकार देत आहेत.हलाखीशी लढत शेती करणाऱ्या कास्तकारांना उधारीत बियाणे घेण्याशिवाय पर्यायच नाही. पेरणीच्या काळात नेहमीच्या कृषीेकेंद्रातून उधारीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करायची आणि शेतमाल विकल्यानंतर सर्व उधारी एकरकमी फेडायची, असा बहुतांश कास्तकारांचा शिरस्ता आहे. कृषीकेंद्रचालकही या व्यवहारात खूषच होते. कारण, ज्या कास्तकारांना उधारीत बियाणे दिले, त्यांचा शेतमाल कमी किमतीत खरेदी करण्याची त्यांना मुभा मिळायची. बहुतांश कृषीकेंद्र चालकच दलालीच्या धंद्यात असल्याने त्यांना असा व्यवहार सहज शक्य होता. तर हाती पैसा नसतानाही कास्तकारांचीही पेरणीची सोय व्हायची. परंतु, कास्तकारांच्या याच अडचणीचा फायदा घेत बनावट बियाणे, बोगस बियाणे विक्री करण्याचेही प्रकार सुरू होते. त्यावर अंकुश लावण्यासाठी यंदा जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बोगस बियाणे विकून एखाद्या कास्तकाराची फसवणूक झाल्यास संबंधित कृषीकेंद्रचालकावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश आहेत. या आदेशाचा जिल्ह्यातील कृषीकेंद्रचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे देण्यात आता कृषी केंद्र धारकांना धोका वाटतो आहे. एखाद्या कास्तकाराला बियाणे विकल्यानंतर ते उगवले नाही, तर गुन्हे दाखल होणारच; मात्र उधारीही वसूल होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे दरवर्षी उधारीचे व्यवहार करणाऱ्या कास्तकारांना यंदा कृषी केंद्रातून परत पाठविले जात आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याचा दिलेला आदेश उपयुक्त असताना त्याच आदेशाच्या धसक्याने उधारीवर मिळणारे बियाणे दुरापास्त झाले आहे. कृषीकेंद्रांवर वचक निर्माण करताना प्रशासनाने कास्तकारांना पीककर्ज सुलभरीत्या आणि तातडीने मिळण्याचा मार्ग खुला करण्याची गरज आहे. आर्थिक तंगीतील कास्तकारांनी यावर्षी धूळपेरणी टाळली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बरसलेल्या पावसानंतर पेरणीची लगबग सुरू केली. मात्र, केवळ उधारीवरच ज्यांच्या शेतीचा संपूर्ण डोलारा आहे, त्या शेकडो शेतकऱ्यांना अजूनही पेरणी करता आलेली नाही. उधार बियाण्यांसाठी कास्तकारांनी हात पसरताच कृषीकेंद्रचालकांनी हात आखडता घेतला आहे.बँकांनी त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचेगुन्हे दाखल करण्याच्या आदेशाने ग्रामीण भागातील कृषी केंद्रचालक सध्या धास्तावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे ते बी-बियाणे उधार देण्यास तयार नाही. शेतकऱ्यांकडेही गेल्या तीन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे दमडीही शिल्लक नाही. अशावेळी आता केवळ बँकाच शेतकऱ्यांच्या तारणहार आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्या पेरणीचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे. अद्यापही जिल्ह्यात ३५ ते ४० टक्के पेरण्या व्हायच्या आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बँकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून वरिष्ठांनीही तसे आदेश बँकांना द्यावेत.