आॅनलाईन लोकमतजवळा : भरधाव ट्रकने तीन दुचाकीसह इंडिका कारला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना आर्णी-यवतमाळ मार्गावरील शेलू फाट्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. निष्काळजीपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णू तुकाराम कोडापे (६०) रा. लोणी असे मृताचे नाव आहे. तर इंडिका चालक जितेंद्र विजय राठोड (२७), युवराज वरलाल जाधव (२८) दोघे रा. सातघरी ता. महागाव, दुचाकीस्वार संदीप नानाजी राऊत, शेख सालार शेख उस्मान (३५), बुरेखान पठाण (३५) दोघे रा. शास्त्रीनगर आर्णी असे जखमींची नावे आहे. जयेंद्र किसन कोडापे (२८) रा. लोणी हा आपल्या दुचाकीने विष्णू कोडापे यांच्यासह यवतमाळकडे जात होते. त्याचवेळी आर्णीकडून यवतमाळकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने शेलू फाट्यावर दुचाकीला मागून धडक दिली. त्यात विष्णू कोडापे हा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. दरम्यान, या दुचाकी मागे असलेल्या इंडिकाला ट्रकने धडक दिली. त्याचवेळी सोबत असलेल्या इतर दोन मोटरसायकललाही या ट्रकने जबर धडक दिली. एकाच वेळी चार वाहनाला धडक दिल्याने एकच गोंधळ उडाला. जखमींना तत्काळ आर्णी व त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताने आर्णी मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
ट्रकची तीन दुचाकीसह कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:12 IST
भरधाव ट्रकने तीन दुचाकीसह इंडिका कारला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना आर्णी-यवतमाळ मार्गावरील शेलू फाट्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.
ट्रकची तीन दुचाकीसह कारला धडक
ठळक मुद्देएक ठार, पाच जण जखमी : शेलू फाट्यावर विचित्र अपघात