शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कार अपघातात आईसह मुलगी ठार

By admin | Updated: July 28, 2015 03:20 IST

मानकोपराजवळची घटना : वडील-मुलगा गंभीर, यवतमाळच्या सिंघानियानगरातील परिवार

मानकोपराजवळची घटना : वडील-मुलगा गंभीर, यवतमाळच्या सिंघानियानगरातील परिवारदारव्हा : भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात आईसह मुलगी ठार झाली. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा-कारंजा मार्गावरील मानकोपरा गावाजवळ सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी मुलाला नागपूर येथे तर वडिलांना यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.आरती अनिल कठाळे (२८), भाविनी अनिल कठाळे (९) असे मृत मायलेकीचे नाव आहे. तर अनिल कानुजी कठाळे (३०) आणि मुलगा ओम अनिल कठाळे (४) अशी जखमींची नावे आहे. दारव्हा तालुक्यातील मूळ लाखखिंड येथील अनिल कठाळे आपल्या व्यवसायानिमित्त यवतमाळच्या सिंघानियानगरात राहतात. त्यांचा ओम साई पॉवर टूल हा व्यवसाय आहे. रविवारी रात्री ते परिवारासह मारूती सुझुकी स्वीप्ट कार एम.एच.३१- सीपी-८८०८ ने सासूरवाडी असलेल्या दर्यापूर तालुक्यातील निमखेड बाजार येथे जात होते. दारव्हा ते कारंजा मार्गावरील मानकोपरा गावाजवळ पहाटे २ वाजताच्या सुमारास कार चालवीत असलेल्या अनिलचे नियंत्रण गेले आणि कार सरळ झाडावर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, आरती आणि भाविनी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल कठाळे व त्यांचा मुलगा ओम कठाळे गंभीर जखमी झाले. अपघातात ठार झालेली भाविनी यवतमाळच्या जॉयन्टस् इंग्लिश स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होती तर आरती गृहिणी होती. दारव्हा येथे शवविच्छेदन पार पडल्यानंतर लाखखिंड येथे सोमवारी दुपारी मायलेकींवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)