शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

वनरक्षक भरतीचा पेपर दुसऱ्या दिवशीही रद्दच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:45 IST

रविवारी वनरक्षक पदाचा पेपर अर्ध्यावर रद्द करण्यात आला. सोमवारीही वनविभागाच्या भरतीचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचाही पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी संतापले : जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रविवारी वनरक्षक पदाचा पेपर अर्ध्यावर रद्द करण्यात आला. सोमवारीही वनविभागाच्या भरतीचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचाही पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे.रविवारी वनरक्षक पदाच्या पेपरदरम्यान मोठा गोंधळ झाला. यामुळे दोन्ही सत्रातील पेपर रद्द करण्यात यावे. इतकेच नव्हेतर महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्यात याव्या. पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षा घेण्यात यावी, संबंधित यंत्रणेवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.वनरक्षक भरती प्रक्रिया महापोर्टलच्या माध्यमातून राबविली जात आहे. या परीक्षेत एकाच संगणकावर दोन विद्यार्थी बसविण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेचे नियोजन नव्हते. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. दीड ते दोन तास पेपर उशिरा सुरू करण्यात आला. महापोर्टलच्या परीक्षेवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नव्हते. यामुळे हा गोंधळ उडाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यावेळी महेश ढवळे, देवा राठोड, सुशिल शेंद्रे, रवींद्र राठोड, अंकुश चक्करवार, पंकज राजूरकर, पे्रम चिकाटे, नीलेश तिजारे उपस्थित होते.परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला नाही. एकाच डेक्सटॉपवर दोन विद्यार्थी बसले नाही. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचा पेपर रद्द करण्यात आला. तसे एसएमएस विद्यार्थ्यांना पाठविले. परीक्षेची नवी तारीख विद्यार्थ्यांना कळवू.- अविनाश पवार, महापरीक्षा आयटी सेल, यवतमाळ