शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कालवा कचऱ्याने अडला; रबीची काळजी तुंबली

By admin | Updated: November 18, 2015 02:32 IST

हस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.

अभियंत्याचे दुर्लक्ष : जमीन तयार; आता प्रतीक्षा पाण्याचीआरिफ अली बाभूळगावहस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा असली तरी कालवे विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनीच या ठिकाणी भेट देण्याची मागणी होत आहे. रबी हंगामाकरिता प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्यामधून सोडण्यात आले आहे. मात्र यातील पाणी हस्तापूर-सावंगी (मांग) रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचतच नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहे. पाटसऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काडीकचरा गोळा झाला आहे. झाडेझुडपेही वाढली आहे. यामुळे पाणी येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पाणी सोडण्यापूर्वीचे नियोजन कालवे विभागाने केलेच नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा आता संकटात सापडला आहे. रबी हंगामात गहू, हरभरा याकरिता शेतकऱ्यांनी आपली जमीन तयार करून ठेवली आहे. मात्र हस्तापूर मार्गावरील सुरुवातीचे चार-पाच शेत वगळता पाणी पुढे सरकायलाच तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र त्याचा काहीही उपयोग होवू शकला नाही. नंतर शेतकऱ्यांनी उपअभियंता जळेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. आपला प्रभार पी.एन. गोतमारे यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. गोतमारे यांच्याकडूनही व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे जमीन तयार करून पाण्याच्या प्रतीक्षेत बसून असलेले शेतकरी मेटाकुटीस आले आहे. सध्याच्या स्थितीत कृष्णा दांडगे, संजय मदने, अरुण मदने, संजय खोडे, शेख रहेमतुल्ला, किशोरीलाल गुप्ता, बबलू दातारकर, अभय तातेड, वैभव चेंडकापुरे, शहेजाद शेख, अशोक रोम, सैयद जहीर, नरेश चेंडकापुरे, नयना चेंडकापुरे, गारगाटे, डवले, भाऊ ठाकरे, नंदकुमार गुप्ता आदी शेतकरी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या धुऱ्यावर केवळ कालव्याच्या पाण्याची ओल आली आहे. सोयाबीनने दगा दिल्यामुळे रबी हंगामावर आशा लावून बसलेला शेतकरी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे खचून गेला आहे. आता अधीक्षक अभियंत्यांनी या ठिकाणी भेट द्यावी, अशी मागणी होत आहे.