शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

काळी येथे आरोग्य केंद्रच पडले आजारी

By admin | Updated: March 20, 2017 00:28 IST

महागाव तालुक्यातील काळी दौ. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या आजारी असल्याचे दिसत आहे.

मोहदी : महागाव तालुक्यातील काळी दौ. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या आजारी असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळत नाही. उपचाराकडे दुर्लक्ष केल्या जाते. रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ हजर नसतात. तातडीने उपचार उपलब्ध होत नाही. संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरली आहे. आरोग्य केंद्रात ड्युटी चार्ट कधीही लावला जात नाही. वास्तविक हा चार्ट दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. कोण कधी ड्युटीवर आहे हे कळायला मार्ग नसतो. या संबंधी विचारणा केल्यास उलट उत्तरे मिळतात. शुद्ध पिण्याचे पाणीही या ठिकाणी उपलब्ध नाही. येथील निवासस्थानात एक परिचारिका व एक परिचर एवढेच राहतात. अधिकारी मात्र या ठिकाणी राहात नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तुसडेपणाची वागणूक मिळते. त्यामुळे आधीच त्रस्त असलेला रुग्ण या ठिकाणाहून त्वरित बाहेर पडतो. आवश्यक त्या औषधींचा साठा या ठिकाणी कधीच उपलब्ध राहत नाही. शिल्लक आजारावरही रेफर करण्यावर भर दिला जातो. या सर्व गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)