शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात प्रथमच बायपास हृदय शस्त्रक्रिया

By admin | Updated: April 30, 2017 01:14 IST

जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत लौकिक वाढविणारी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यवतमाळ : जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत लौकिक वाढविणारी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाल्याने ५८ वर्षीय शेतकऱ्यावर बायपास शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. हृदयरोग तज्ज्ञांनी नागपुरातील तज्ज्ञांच्या मदतीने यवतमाळातच ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती डॉ. सतीश चिरडे यांनी दिली. उल्हास लच्छू राठोड (५८) रा. पाटापांगरा ता. घांटजी, असे त्याचे नाव आहे. डॉ. सतीश चिरडे यांच्याकडे तो उपचारासाठी आला. मात्र एक हजार रूपयावर अधिकचा खर्च उपचारासाठी करणे शक्य नसल्याचे त्याने सांगितले. अशा स्थितीत चिरडे यांनी डॉ. सुरेखा येलनारे, डॉ. नीलेश येलनारे आणि नागपुरातील तज्ज्ञ डॉ. सौरभ वार्शिनेय, डॉ. पद्मजा देशपांडे, डॉ. शीतल मानकर यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया येथेच करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री मदन येरावार यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख २५ हजार रूपयांची मदतही मिळाली. इतक्याच रकमेत डॉक्टरांनी येथील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहात ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. सध्या उल्हास राठोड यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना दोन दिवसात सुटी देणार असल्याचे डॉ. चिरडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)