शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:24 IST

तालुक्यातील १७ गावांमधील २३ प्रभागांमध्ये २३ सदस्यांची पदे विविध कारणाने रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे आजपासून नामनिर्देशन सुरू : १७ गावांच्या २३ सदस्यांसाठी निवडणूक

ऑनलाईन लोकमतवणी : तालुक्यातील १७ गावांमधील २३ प्रभागांमध्ये २३ सदस्यांची पदे विविध कारणाने रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र भरण्याला सुरूवात होणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरले जाणार आहे. यावेळी नामनिर्देशनपत्र आॅनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहे. मात्र आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.तालुक्यातील घोन्सा, कुंभारखणी, नवरगाव, निलजई, शेवाळा, कुर्ली, साखरा (को.), ढाकोरी बोरी, कळमना (खु.), लालगुडा, वरझडी, वारगाव व अहेरी येथील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे, तर चिंचोली, परसोडा व चनाखा येथील प्रत्येकी दोन जागासाठी आणि राजूर (कॉलरी) येथे चार जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र देण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर मुदतवाढ देण्यात न आल्याने या निवडणुकांसाठी आरक्षित पदांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.निवडणूक विभागाने मारेगाव (कोरंबी) येथील पाच पदासाठीही निवडणूक जाहीर केली होती. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर २ डिसेंबरला ग्रामविकास मंत्रालयाने येथील सरपंच व चार सदस्यांचे अपिल मंजुर करून त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे निवडणूक विभागाने मारेगाव कोरंबी येथील पाच पदासाठी होणारी निवडणूक रद्द केली आहे.ग्रामविकास मंत्रालयाने अपिल मंजुर करताना सरपंच व सदस्यांना ताकीद देऊन ग्रामपंचायत अधिनियमाचे यापुढे उल्लंघन करण्यात येऊ नये, असे बजावण्यास अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार रवींद्र जोगी हे काम पाहत आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी जी.एन.देठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.२३ पैकी २० जागा महिलांसाठीग्रामपंचायतीमधील पोटनिवडणूक जाहीर झालेल्या १७ गावातील २३ जागांपैकी घोन्सा व अहेरी येथील दोन जागा वगळता सर्व जागा आरक्षित गटातल्या आहेत. त्यातही २३ पैकी २० जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. यातील बऱ्याचशा जागा मागील निवडणुकीत त्या संवर्गासाठी उमेदवारी अर्ज न भरल्या गेल्यानेच रिक्त राहिल्या होत्या, तर घोन्सा, राजूर व वारगाव येथील ग्रामपंचायत उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्याने त्या जागा रिक्त झाल्या आहेत. आता नामनिर्देशनासोबत पुन्हा जात वैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याने यापैकी किती जागांसाठी अर्ज येतील, हे मुदतीअंतीच कळणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक