शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

शेतमालाला हमी भाव मिळावा, याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र अर्ध्यापेक्षा जास्त शेतमाल व्यापाºयांच्या घषात गेल्यानंतरसुद्धा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. सीसीसीआय व पणन महासंघ कापूस, तर नाफेडतर्फे सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद आदी शेतपिकांची खरेदी केली जाते.

ठळक मुद्देसीसीआयला आली जाग : नाफेडचे खरेदी केंद्र मात्र अद्याप बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : थोडे उशीरा का होईना, येथे अखेर सोमवारपासून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली. मुहूर्तालाच कापूस विक्रीसाठी गर्दी झाली होती. आवक आणखी वाढण्याची चिन्हे आहे. शासकीय केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.येथे शेतमाल खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे तत्काळ ऑनलााईन नोंदणी व कापसाची खरेदी सुरू करण्यात आली, हे विशेष. परंतु सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे कापूस खरेदीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी नाफेडचे शेतमाल खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे धान्य खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतमालाला हमी भाव मिळावा, याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र अर्ध्यापेक्षा जास्त शेतमाल व्यापाºयांच्या घषात गेल्यानंतरसुद्धा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. सीसीसीआय व पणन महासंघ कापूस, तर नाफेडतर्फे सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद आदी शेतपिकांची खरेदी केली जाते. शासनाने मोठा गाजावाजा करून खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. जाहिरातींद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले. मात्र येथे नोंदणी तसेच खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. नाफेडने येथे ऑनलाईन नोंदणीसाठी निविदा काढली होती. त्यानुसार हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले. परंतु अद्याप नोंदणी सुरू झाली नाही.सीसीआयने दोन खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीला मंजुरी दिली. तेथेच ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात नोंदणी वा खरेदीला सुरुवात झाली नव्हती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच सहकार विभाग, सीसीआय तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर वेगाने हालचाली झाल्या आणि लगेच ऑनलाईन नोंदणी व कापूस खरेदीला सुरुवात झाली. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.शेतकऱ्यांचा सन्मान, ‘लोकमत’चे आभारजाधव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीच्या शुभारंभाला मान्यवरांच्या हस्ते प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शासकीय शेतमाल खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचा मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच शेतकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, सहाय्यक निबंधक अजित डेहणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जी.एस. कुमरे, सचिव पुरुषोत्तम चंचलकर, माजी सचिव शेषराव सावध, नगरसेवक शरद गुल्हाने, जाधव कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक भाऊराव जाधव, सुभाष राठी, किरण खडसे, अमोल दहापुते, सचिन पुरी, सूरज चव्हाण, सीसीआयचे अधिकारी आदींसह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस