शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शस्त्रांची ऑनलाईन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:35 IST

यवतमाळात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालय स्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. आता तर शहरातील टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे.

ठळक मुद्देसात चाकूंचे बुकिंग : ही तयारी कशासाठी? पोलिसांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील गुन्हेगारी जगतात वरकरणी शांतता दिसत असली तरी येत्या काळात मोठा भडका उडण्याची भीती आहे. राजकीय घडामोडींचा प्रभाव येथील गुन्हेगारी जगतावर राहिला आहे. अंतर्गत धूसफूस सुरू असून स्वसंरक्षणासाठी, वचपा काढण्याकरिता शस्त्रांची जमवाजमव केली जात आहे. परंपरागत पद्धतीने शस्त्र आणण्याऐवजी आता थेट ऑनलाईन खरेदीला पसंती दिली जात आहे. यवतमाळ शहरात ब्रॅन्डेड शस्त्रांना चांगली डिमांड असल्याचे एका ऑनलाईन शॉपी अ‍ॅपने प्रसिद्ध केले आहे.यवतमाळात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालय स्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. आता तर शहरातील टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी थेट शस्त्रांची ऑनलाईन खरेदी सुरू आहे. वर्षभरापूर्वी एकाने चक्क अमृतसर येथून पोस्टाच्या पार्सलमधून धारदार तलवारी बोलाविल्या होत्या. या पार्सलचे कव्हर फाटल्याने हा प्रकार उघड झाला. मात्र त्यानंतरही गुन्हेगारी जगतातील मोठ्या प्रमाणात शस्त्र बोलावण्याचे सत्र सुरू आहे. स्नॅपडिल या ऑनलाईन शॉपींग अ‍ॅपने यवतमाळ शहराला तर गुड रिमार्क दिला आहे. या शहरातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे. स्नॅपडीलवर धारदार काटे असलेल्या ११०० चाकूचे बुकींग करण्यात आले. त्यापैकी सात चाकू यवतमाळातून मागविले आहे.गुन्हेगारी जगतातील अंतर्गत कुरघोड्या लक्षात घेता काहींनी अवैध शस्त्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आॅनलाईन शस्त्र खरेदी करायचे व येथे त्याची दुप्पट दरात विक्री करायची हा व्यवसाय जोरात सुरु आहे. चाकू, तलवार यासोबतच अग्नीशस्त्राचीही उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे.युवक काँग्रेसचे पोलिसांना निवेदनस्नॅपडील या ऑनलाईन खरेदी अ‍ॅपवरुन चाकू यवतमाळात येत असल्याबाबत युवक काँग्रेसच्या ललित जैन यांनी एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर यांना निवेदन दिले. हा गंभीर प्रकार असून स्नॅपडीलने सूपरहीट यवतमाळ अशी टॅग लाईन टाकून सात चाकू विकल्या गेल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकार युवक काँग्रेसच्या सदस्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.