शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिका विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:16 IST

नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : स्थायी समितीत पथदिवे कंत्राटदाराच्या चौकशीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले.३१ जुलै रोजी आयोजित स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली होती. या बैठकीत अजेंड्यावरील नऊ मुद्यांवरच चर्चा झाली. त्यानंतर ही सभा तहकूब झाली होती. उर्वरित विषयांना मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी सभा घेण्यात आली. या सभेत किरकोळ निविदांना मंजुरी देण्यात आली. यात फोटोग्राफी, स्टेशनरी खरेदी, बिछायत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर वारसा हक्काने नियुक्ती, विविध कॉलनीतील मंदिर परिसरात असलेल्या सभागृहांची भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या सभागृहांची देखभाल दुरूस्ती व स्वच्छता नियमित करता येईल.शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी तहसील चौक, वंजारी फैल, लोहारा, वडगाव, भोसा येथील कोंडवाडे दुरूस्तीचा ठराव मान्य करण्यात आला. जेसीबी आॅपरेटर व फॉगिंग मशीन आॅपरेटरचे कंत्राट काढणे, तसेच प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र फॉगिंग मशीन देण्याचा प्रस्ताव आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी ठेवला. यालाही मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागाची वाहन दुरूस्तीसह सावरगड येथील ओडब्ल्यूसी मशीन दुरूस्त करून चालविण्यास देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे शहरातील स्लॉटर वेस्टपासून खत निर्मिती करता येणार आहे.पथदिवे कंत्राटदार नागपुरात काळ्या यादीतपथदिवे साहित्यासह देखभाल दुरूस्ती निविदेवर काँग्रेसच्या वैशाली सवाई यांनी आक्षेप घेतला. सदर कंत्राटदाराला नागपुरात ‘ब्लॅक लिस्टेड’ केल्याचे सांगितले. यावर सभागृहाने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी सखोल चौकशी करून या निविदेचा निर्णय घ्यावा, असे सुचविले. बैठकीत सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. पहिल्यांदाच बैठक मुद्देसूद चर्चा आणि आरोप प्रत्यारोपाविना पार पडली.गाळ्यांसाठी फेरनिविदाआठवडी बाजारातील संकुलात बांधलेले गाळे अनामत रक्कम भरुनही ताब्यात घेतले नाही. चर्चेलाही प्रतिसाद मिळाला नाही. या गाळ्यांचा फेरनिविदेने लिलाव करावा या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका