शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी थेट जमीन खरेदी

By admin | Updated: August 11, 2016 00:57 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांंदेड रेल्वे मार्गातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून

अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : कामाला गती यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांंदेड रेल्वे मार्गातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून भूसंपादन विभागाने थेट जमीन खरेदीच्या दृष्टीने पावले उचलली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांची कार्यशाळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी घेण्यात आली. लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला फेब्रुवारी २००८ मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर यवतमाळ येथे ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र या रेल्वे प्रकल्पात भूसंपादनाचा मोठा अडसर येत होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन रेल्वेच्या विशेष योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्याची मागणी केली होती. २ जून रोजी रेल्वे मंत्रालयाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकल्पाला विशेष रेल्वे प्रकल्पाचा दर्जा दिल्याचे जाहीर केले. रेल्वे कायद्यांतर्गत विहीत मुदतीत दोन वर्षात जमीन अधिग्रहण करणे यामुळे बंधनकारक झाले. तसेच रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी थेट खरेदीचा प्रस्तावही पुढे आला. यासाठी १२ मे २०१५ च्या सरळ खरेदी कायद्याचा अवलंब करण्यात येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी करताना कुठली खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. भूसंपादन अधिनियम २०१३, रेल्वे अ‍ॅक्ट १९८९ राष्ट्रीय महामार्ग १९५६ कायद्यात कुठल्याबाबी आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करताना कोणते बारकावे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, याची माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्यासह रेल्वे मार्गाशी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी उपस्थित होते. त्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. आता रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. (शहर वार्ताहर) ड्रीम प्रोजेक्ट शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला बळ देणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच रेल्वे अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही पाठपुरावा केला.