शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

कापूस खरेदी खासगी बाजार समितीत

By admin | Updated: December 7, 2014 22:58 IST

शासनाची कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध असताना पणन महासंघाने चक्क खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू केल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष असे याबाबत

अपवाद : पांढरकवड्यात शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळलेयवतमाळ : शासनाची कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध असताना पणन महासंघाने चक्क खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू केल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष असे याबाबत शासनाच्या बाजार समितीचे पदाधिकारी अथवा प्रशासनानेसुद्धा ब्र काढलेला नाही. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत पणन महासंघ हे फेडरेशनचा सब एजंट म्हणून काम करीत होते. परंतु आता पणनकडेही पैसा नाही आणि नाफेडकडेही नाही. म्हणून पणनने आता कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय)चे सब एजंट म्हणून काम सुरू केले आहे. बहुतांश ठिकाणी शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणनची कापूस खरेदी सुरू झाली असताना पांढरकवडा मात्र त्याला अपवाद ठरले आहे. पांढरकवड्यात चक्क खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. वास्तविक या खासगी बाजार समितीमध्ये पुरेशा सोईसुविधा नसल्याच्या कारणावरून पणन संचालकांनी व त्यानंतर पणन मंत्र्यांनीसुद्धा परवाना रद्द केला होता. मात्र उच्च न्यायालयाने मंत्र्यांच्या या निर्णयाला स्थगनादेश दिला. पांढरकवडा बाजार समिती सक्षम असताना खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी पणनने सुरू करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. त्यामागे पणनचे राजकारण, पदाधिकाऱ्यांचा दबाव आणि उलाढाल असण्याची दाट शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे. त्याहून आश्चर्य असे की, लाखो रुपयांचा सेस मिळवून देणारी कापूस खरेदी खासगी बाजार समितीने पळविल्यानंतरही पांढरकवड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याबाबत ब्रसुद्धा काढला नाही. यावरून शासकीय व खासगी बाजार समितीची ‘मिलीभगत’ तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. यापूर्वी सीसीआय आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने पांढरकवडा येथे रूईगाठींचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हापासून सीसीआयच्या लेखी पांढरकवडा हे काळ्या यादीत आहे. आज मात्र अप्रत्यक्षपणे पुन्हा सीसीआयच येथे कापूस खरेदी करीत आहे. (प्रतिनिधी)