शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांच्या उपचारासाठी ९५ लाखांची यंत्र खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:20 IST

जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे असे एसएसयू नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या गंभीर रुग्णांना काही तास निगराणीत ठेवणे शक्य होत नाही. दोन ते तीन बेड असल्याने डॉक्टरांची अडचण होते.

ठळक मुद्दे‘मेडिकल’चा कारभार : एसएसयू नसताना बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचा सोस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे असे एसएसयू नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या गंभीर रुग्णांना काही तास निगराणीत ठेवणे शक्य होत नाही. दोन ते तीन बेड असल्याने डॉक्टरांची अडचण होते.रुग्णालय प्रशासनाने जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्याकडून चालू आर्थिक वर्षात नवीन यंत्रसामुग्री खरेदीचा प्रस्ताव तयार केला. एक कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांच्या यंत्र खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये आठ अडॉल्ट व्हेंटिलेटर ज्याची किंमत ९२ लाख ८० हजार इतकी आहे. हे व्हेंटिलेटर विषबाधा झालेल्या रुग्णांसाठी गरजेचे आहे. येथे विषबाधेच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे. मात्र बॅरिअ‍ॅट्रिक (लठ्ठपणाच्या) सर्जरीसाठी लॅप्रोस्कोप विथ आॅल अ‍ॅसेसरिज ६० लाख रुपये आणि बॅरिअ‍ॅट्रिक आॅपरेशन टेबल ३५ लाख रुपये हे साहित्य खरेदी केले जाणार आहे. प्रत्यक्ष यापेक्षा अत्यावश्यक असे जनरल सर्जरीसाठी लॅप्रोस्कोप खरेदी करणे गरजेचे आहे. सध्या एकच लॅप्रोस्कोप असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. लॅप्रोस्कोपच्या माध्यमातून विनाटाका-विनाचिरा शस्त्रक्रिया करता येते. रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे या प्रस्तावात लॅप्रोस्कोप खरेदीचा प्राधान्याने समावेश करणे अपेक्षित होते. शिवाय शस्त्रक्रियागृहात एसएसयू (शार्ट स्टे यूनिट) अद्यावत असणे आवश्यक आहे. येथील कॉटची क्षमता वाढविण्याची गरज आहे. केवळ दोन ते तीन कॉट एका कोंदट रूममध्ये टाकून एसएसयू चालविले जात आहे. येथेच रुग्णांना संसर्ग होण्याची भीती आहे.गरीब रुग्णांच्या हिताचा विचारच नाहीपूर्णत: संसर्गमुक्त व सुविधेने सुसज्ज असा एसएसयू प्राधान्याने तयार करणे गरजेचे आहे. खनिज विकास निधीतून यासाठी निधी न मागता लठ्ठपणाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्री अंतर्भूत केली आहे. एकंदर गरीब रुग्णाच्या हिताचे निर्णय होताना दिसत नाही. या खरेदी प्रस्तावाला जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गरज लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन अपेक्षित आहे. लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया सामुग्रीऐवजी अत्यावश्यक असा एसएसयू तयार करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते.