शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार क्विंटल तूर खरेदी

By admin | Updated: June 19, 2017 00:55 IST

गत पाच महिन्यात उमरखेड उपविभागातील उमरखेड व महागाव तालुक्यातील तीन हजार २९८

नाफेडची खरेदी : उमरखेडमध्ये पुन्हा तूर खरेदीची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गत पाच महिन्यात उमरखेड उपविभागातील उमरखेड व महागाव तालुक्यातील तीन हजार २९८ शेतकऱ्यांची ३५ हजार ६४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेड व शासनाने पुन्हा तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी उपविभागातील एक हजार २३८ शेतकऱ्यांनी केली आहे. उमरखेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नाफेडने तूर खरेदी केली. १६ जानेवारी ते ६ जून या कालावधीत ३५ हजार ६४२ क्विंटल तुरीची खरेदी झाली. खरेदी काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. खरेदीचा हा यवतमाळ जिल्ह्यातील विक्रम आहे. तूर विकलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीपूर्वीच रकमा वितरीत करण्यात आल्या आहे. परंतु आजही अनेक शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. त्यामुळे महागाव आणि पुसद तालुक्यातील एक हजार २३८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांनी आता तत्काळ पुन्हा तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान शासनाने तूर खरेदीबाबत सनियंत्रण समिती गठित केली असून समितीचे अध्यक्ष तहसीलदार भगवान कांबळे आहे तर सदस्य सचिव म्हणून सहायक निबंधक सुनील भालेराव, बाजार समिती सचिव संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे काय याची पाहणी केली जात असून दोन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश बाजार समितीला देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा तूर खरेदी सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. शासन आदेश केव्हा काढणार याकडे लक्ष लागले. शेतकऱ्यांच्या घरी तूर उमरखेड आणि महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अद्यापही तूर आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. परंतु तूर विकली जात नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नाफेडने पुन्हा खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.