शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये जाळपोळ, दगडफेकीने तणाव

By admin | Updated: July 31, 2014 00:14 IST

रमजान ईदच्या दिवशी शिवाजी चौकात वाहन पार्किंगवरून पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादाचे पडसाद पुसद शहरात दुसऱ्या दिवशीही उमटले. शहरातील काही भागात जाळपोळ तर

जमावबंदी लागू : वाहनांचे नुकसान, पोलिसांचा चोख बंदोबस्त, शांततेचे आवाहनपुसद : रमजान ईदच्या दिवशी शिवाजी चौकात वाहन पार्किंगवरून पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादाचे पडसाद पुसद शहरात दुसऱ्या दिवशीही उमटले. शहरातील काही भागात जाळपोळ तर काही भागात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान पोलिसांनी २५ आरोपींची ओळख पटविली असून त्यातील ११ जणांना अटक करण्यात आली. पुसद येथे मंगळवारी रमजान ईदच्या दिवशी वाहन पार्किंगवरून डॉ.मोहंमद नदीम आणि एपीआय धीरज चव्हाण यांच्यात वाद झाला. या वादानंतर जमाव पुसद शहर पोलीस ठाण्यावर धडकला. ठाण्यातून परत जाताना शहरातील काही खासगी रुग्णालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. या घटनेनंतर पुसद शहरात तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पुसद शहरात उमटले. शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, मुखरे चौक, सुभाष चौक आणि बसस्थानक परिसरातील दुकानांवर तुफान दगडफेक करण्यात आली. तर नाईक चौकाजवळील एका मोटार मेकॅनिकलचे गॅरेज जाळण्यात आले. त्यात दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारसायकली जळाल्या. तसेच पाण्याच्या टाकीजवळ असलेले फळ विक्रेत्याचे दुकानही पेटवून देण्यात आले. गुजरी चौकात असलेले सखाराम तगडपल्लेवार यांचे गोदामही जमावाने पेटवून दिले. या घटनेची माहिती पुसद शहरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला. वाशिम, अकोला येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. दरम्यान शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शांतता समितीची सभा मंगळवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेला अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, डॉ.एन.पी. हिराणी, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, विजय पाटील चोंढीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, तहसीलदार भगवान कांबळे, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. मनोहरराव नाईक म्हणाले, प्रशासनाला काय कारवाई करायची ती करावी. खऱ्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्या दोषींवर मोक्का लावा की त्यापेक्षाही कठोर कारवाई करा, माझा पूर्णपणे प्रशासनाला पाठिंबा राहील, यात राजकारण येणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधील दोषींवर कडक कारवाई करून त्यांंना दोन दिवसात अटक झालीच पाहिजे. भविष्यात पुन्हा पुसद शहरात असा प्रकार करण्याची हिंंमत कोणी करणार नाही, असे ना. नाईक यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश डुबेवार यांच्या नेतृत्वात शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस विभागाला निवेदन देऊन दोषींंवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आयएमए व पुसद वैद्यकीय संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. दोषींना अटक करा अन्यथा बेमुदत दवाखाने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला.शांतता समितीची सभा सुरु असतानाच पुसद शहरातील बसस्थानक परिसर, डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक परिसरात दगडफेक सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांची धावपळ सुरू झाली. तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. राजकीय पक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स आणि डॉक्टर संघटनेच्यावतीने पुसद शहरात बंद पुकारण्यात आला होता. शहरातील सर्व प्रतिष्ठाने व दवाखाने कडकडीत बंद होते. दरम्यान अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी शहरात तोडफोड झालेल्या भागाची पाहणी केली. सकाळी १० वाजता त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विजय जाधव, सुभाष कासेटवार आणि डॉक्टर मंडळीही होती. खासदार भावना गवळी यांनी पुसद शहराला भेट देऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)