शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा दणका, मध्यरात्रीच शवविच्छेदन

By admin | Updated: January 25, 2017 00:09 IST

शवविच्छेदनासाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांना मन:स्ताप देणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला आमदार बच्चू कडू यांनी हिसका दाखविताच ...

बच्चू कडूंनी जागली रात्र : आर्णी मार्ग अपघातातील सात मृतदेह पहाटे नातेवाईकांच्या स्वाधीन यवतमाळ : शवविच्छेदनासाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांना मन:स्ताप देणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला आमदार बच्चू कडू यांनी हिसका दाखविताच मध्यरात्रीच शवविच्छेदन होऊन त्यांचे देह नागपूरकडे रवाना झाले. अपघातातील सात जणांचे शवविच्छेदन तातडीने व्हावे यासाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांचा सुरुवातीला प्रस्ताव धुडकावून ‘मेडिकल’ने पुन्हा हृदयशून्यतेचा परिचय दिला. यवतमाळ -आर्णी मार्गावरील जेतवन जवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील सात जण ठार झाले. या सातही जणांचे मृतदेह यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवगारात ठेवण्यात आले. नागपुरात नातेवाईकांना या अपघाताची माहिती होताच तातडीने यवतमाळ गाठले. तोपर्यंत रात्री ७ वाजले होते. सायंकाळनंतर शवविच्छेदन होत नाही, असे सांगून या नातेवाईकांची रुग्णालय प्रशासनाने बोळवण केली. अनोळखी गावात कोणताही आधार नसल्याने रात्र शवविच्छेदन गृहाबाहेर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही जण याच परिसरातील शासकीय विश्रामगृहावर आले. त्या ठिकाणी रात्री ११ वाजता अचानक आमदार बच्चू कडू यांची भेट झाली. त्यांनी चौकशी केली असता नातेवाईकांनी घटनाक्रम सांगितला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार कडू यांनी सुरुवातीला ‘मेडिकल’चे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रुग्णालयचे अधीक्षक डॉ. बाळकृष्ण बांगडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आमदार कडू यांनी मुंबई मंत्रालयात दूरध्वनीवर या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अधिष्ठातांना मंत्रालय स्तरावरून सूचना देण्यात आली. त्याउपरही अधिष्ठातांकडून शवविच्छेदनाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह आम्हीच शवविच्छेदन करणार असा इशारा दिला. यामुळे धास्तावलेल्या रुग्णालय प्रशासनाची ढिम्म यंत्रणा मध्यरात्री गतिमान झाली. एकापाठोपाठ एक सात मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पहाटेपर्यंत खुद्द आमदार बच्चू कडू हे शवविच्छेदनगृह परिसरात ठाण मांडून बसले होते. नातेवाईकांना अशक्यप्राय वाटणारी मदत मिळाल्याने या दु:खाच्या प्रसंगातही त्यांना मायेचा ओलावा मिळाला. यापूर्वी ‘मेडिकल’च्या हृदयशून्यतेचा परिचय आला होता. गंभीर जखमी रुग्ण लघुशस्त्रक्रिया गृहाच्या टेबलवरून खाली कोसळला. तो तडफडत असतानाही तत्काळ मदत केली नाही. सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर योग्य उपचार झाले असते आणि तो टेबलवरून खाली पडला नसता तर वाचला असता असे नागपूरवरून आलेल्या नातेवाईकांनी उद्वविग्न होऊन सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)