शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमध्ये चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:53 IST

शहराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढले जात नव्हते.

ठळक मुद्देअतिक्रमण हटाओ मोहीम : शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढले जात नव्हते. त्यामुळे अखेरीस शुक्रवारी कळंब नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमणावर बुलडोजर चालवून बहुतेक रस्त्यांना मोकळी वाट करुन देण्यात आली. रस्त्यांनी अनेक वर्षानंतर मोकळा श्वास घेतला, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद आहे.तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार देशपांडे, नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, नगर पंचायत अभियंता प्रज्ञा नरवाडे, मिळकत व बाजार व्यवस्थापक एस.एम.मसराम, ठाणेदार बी.जी.कºहाळे, एपीआय संघरक्षक भगत, पीएसआय राजकिरण मडावी, चंद्रशेखर ठाकरे आदींच्या नेतृत्वात सकाळी सातपासून शहरातील अतिक्रमण काढण्यात सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रीया सुरुच होती. सर्वप्रथम चिंतामणी मंदिर परिसरातील अतिक्रमण मोकळे करण्यात आले. त्यानंतर चिंतामणी मंदीर रोड, राम मंदिर, आठवडी बाजार परिसर, यवतमाळ-नागपूर रोड आदी भागातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले.तत्पूर्वी स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या सूचना प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वीपासूनच देण्यात येत होत्या. त्यानुसार काहींनी स्वत: पुढाकार घेऊन अतिक्रमण काढले. तर काहींनी विरोध दर्शविला. त्यामुळे वादावादीचे प्रसंगीही घडले. काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेऊन प्रकरणावर पडदा टाकला. विशेष म्हणजे काही नगरसेवक व पदाधिकाºयांचेही अतिक्रमण होते. त्यांचे अतिक्रमणसुद्धा या मोहिमेत नेस्तनाबूत करण्यात आले. आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.अतिक्रमण होऊच नयेअनेक वर्षानंतर आज अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण काढण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. त्यामुळे बहुतेक लोकांनी आनंद व्यक्त केला. एकंदरीत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने रस्त्यासोबतच पादचरी व वाहनधारकांनीही सुटकेचा श्वास घेतला. यानंतर अतिक्रमण होणारच नाही, यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.