शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामे जोरात, विकास कामे थंड

By admin | Updated: July 16, 2016 02:42 IST

आर्णी तालुक्यातील जवळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. विविध कामांव्दारे या ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.

जवळा ग्रामपंचायत : पावसाळ््यातही पाण्याची समस्या कायमच जवळा : आर्णी तालुक्यातील जवळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. विविध कामांव्दारे या ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून खर्च न झालेला निधी ग्रामपंचायत आता खर्च करीत आहे. इतर मागास क्षेत्र अनुदान निधी गेल्या दोन-तीन वर्षांपासून पडून होता. ग्रामपंचायतीमधील अंतर्गत कलहामुळे तो पडून होता. मात्र आता ग्रामपंचायतीने निधी खर्च करण्याचा सपाटाच लावला आहे. ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण तसेच संपूर्ण ग्रामपंचायत परिसराला तार कुंपन, इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर गेल्या कित्येक दिवसांपासून अर्धवट राहिलेले राजीव गांधी भवनाचे कामसुद्धा जनसुविधेंतर्गत मिळालेल्या निधीतून केले जात आहे. वॉर्ड क्र. ३ मध्ये सिमेंट रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. आमदार बेग यांच्या निधीतूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झालेली दिसत आहे. ऐवढे असूनसुद्धा गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ््यातसुद्धा महिला आणि मुले पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत. गावातील गटारे कचऱ्याने तुंबलेली आहे. जागोजागी उकिरडे पडलेले असून, ग्रामस्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेले दिसत आहे. गावामध्ये दिवाबत्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत दिवे बंद अवस्थेत पडून आहे. ग्रामपंचायतीला इमारत बांधकामाबरोबरच नागरिकांच्या गरजांकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. विकास कामे करताना कुठल्या कामांना प्राधान्य दिले जावे, या बाबीचा येथे विचारच केला गेला नाही. केवळ निधी खर्चाचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पथदिवे सुरू राहणे सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय आवश्यक आहे. मात्र ही बाब याठिकाणी गांभीर्याने घेण्यात आलेली नाही. (वार्ताहर)