शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक-विद्यार्थी आणि पालक संवाद सेतू बांधा

By admin | Updated: December 14, 2015 02:36 IST

संपूर्ण देशभरात शिक्षणाची संक्रमण स्थिती निर्माण झाली आहे. सुविधा भरपूर आहेत, मात्र शिक्षक आणि समाज दूर जात आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन : प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशनयवतमाळ : संपूर्ण देशभरात शिक्षणाची संक्रमण स्थिती निर्माण झाली आहे. सुविधा भरपूर आहेत, मात्र शिक्षक आणि समाज दूर जात आहे. यावर चिंतन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मजबुत समाज घडविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असा सेतू बांधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते रविवारी यवतमाळ येथे आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत होते.अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. शिक्षण सभापती नरेन्द्र ठाकरे, संघटनेचे अध्यक्ष राजुदास जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, कार्याध्यक्ष गौतम कांबळे, विलास भोयर, जिल्हा समन्वयक अब्दुल जलील, सरचिटणीस विनोद गोडे, राज्य प्रतिनीधी नामदेव महल्ले, पदविधर प्रमुख शरद इंगळे, महिला प्रमुख सुरेखा टोणे, बि.यू. राऊत, शिक्षण सेवक आसाराम चव्हाण उपस्थित होते.पुढे बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, हे अधिवेशन केवळ समस्या मांडण्यासाठीच नव्हे तर गुणवत्ता सुधारण्यासाठी घेण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे कौतुक केले. विविध प्रयोगासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख रूपये दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यात विद्यार्थी आणि गुणवत्ता शाळेसाठी महत्वाची राहणार आहे. जिल्हा परिषद शाळेतून आधुनिक शिक्षण मिळणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला आपली शाळा माझी शाळा वाटली पाहिज, असेही ते म्हणाले. ज्यांच्यासाठी करतोय त्यांचा सहभाग घेतला पाहिजे अध्यक्षांच्या शाळेला आयएसओ नामांकन मिळाले, ते मर्यादित राहायला नको. संघटनेच्या प्रत्येक मुख्याध्यापक सदस्यांनी त्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषण करताना खासदार भावना गवळी म्हणाल्या, शिक्षक जिवंत आणि जाणता असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडतील. आज २७ प्रकारची कामे शिक्षकाला दिली आहेत. चांगली गुणवत्ता गरजेची आहे. बुध्दीजीवी वर्गाने समाजाला घडविण्याचे काम केले आहे. आपले प्रश्न केंद्रात आणि राज्यात सोडविण्यात येतील. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असेही त्या म्हणाल्या. संगणकाअभावी सरल आणि इतर कामे अवघड झाली आहेत. त्यासाठी खासदार निधीतून पंचायत समितीमध्ये संगणक दिले जातील. मात्र निकष पाहिले जातील तपासले जातील. यावेळी त्यांनी सीईओंना पंचायत समितीमधून बिलाची प्रक्रीया करण्याच्या सुचनाही दिल्या. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेमध्ये राजुदास जाधव यांनी, आमची संघटना प्रथम शाळेचे काम आणि नंतरच संघटनेचे काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी चंद्रबोधी घायवटे, मृणालिनी दहिकर, विनोद गोडे आदींसह इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनाला संपूर्ण जिल्हाभरातून हजारो शिक्षकांची आवर्जून उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)जिल्हा नियोजन समितीमधून इलेक्ट्रीक बिलया अधिवेशनात इलेक्ट्रीक बिलाचा प्रश्न पुढे आला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा नियोजन समितीमधून इलेक्ट्रीक बिलाचे पैसे देण्याची घोषणा केली. दर्जदार शिक्षण हा अजेंडा घेऊन आम्ही चालत आहोत. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्यात यावी, दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळावे, खिचडीसह अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी आदी मागण्यांवर राजूदास जाधव यांनी प्रकाश टाकला.