धम्मचक्र प्रवर्तन दिन : अभिवादनासाठी दिवसभर रांगायवतमाळ : ‘घबराये ये जब मन अनमोलतब तू मुखसे बोल,बुद्धम शरनम गच्छामी’यांसारख्या असंख्य गितांमधून भगवान गौतमबुद्धांचे तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न घनश्याम पाटील यांच्या संचाने केला. या सोबतच भीम गितही सादर करण्यात आली. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाने अनेकांचे लक्ष वेधले. आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने ६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी बुद्ध आणि भीम गितांच्या कार्यक्रमाचे बसस्थानक चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले होते. यावेळी घनश्याम पाटील यांच्या संचाने बहारदार गिते सादर करीत इतिहासाला उजाळा दिला.‘झिजली अशी रमाई चंदन जसे झिजावे’, या भीमगिताने अनेकांच्या डोळयात आसवे तरळली. ‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना’, यासारखे असंख्य गिते यावेळी सादर करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या अनुयांंंंंंंंंंयांसह इतरही समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर प्रथम पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना करण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. पुष्पहार अर्पण करण्यासाठी दिवसभर नागरिकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली.यासोबत ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारीत ग्रंथासह विविध पुस्तके आणि भीमगितांच्या कॅसेटस्, सीडीज, दुर्मिळ फोटो विक्रीचे स्टॉलही या ठिकाणी लावण्यात आले होते. या साहित्याची खरेदी करण्यासाठी स्टॉलवर गर्दी होती. यासोबतच शहरातील विविध ठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शिवाय गाव आणि वाड्यांमध्येही धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रवी श्रीरामे, दीपक नगराळे, ओमप्रकाश कुमरे, पवन भारस्कर, अखिलेश गुल्हाने या मंडळींसह असंख्य समाजबांधवांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. (शहर वार्ताहर)
गीतांमधून मांडले बुद्धांचे तत्त्वज्ञान
By admin | Updated: October 13, 2016 00:50 IST