शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:31 IST

पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उधारीच्या औषधीतून सुरू आहे शेतकºयांची लूट

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.संबधित सर्वच कंपनीकडून बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा केला जातो. यासाठी मोठ-मोठ्या जाहिराती करून शेतकºयांना आकर्षित केले जाते. यावर विश्वास ठेऊन अनेक शेतकºयांनी बीटी कपाशी लावण्यास सुरुवात केली. परंतु यावर्षी बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कृषी केंद्र दुकानदारांसह अनेकांचे मार्गदर्शन घेत आहे. यातूनच अळीचा नायनाट करण्यासाठी विविध औषधांची फवारणी केली जाते. औषधी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. दुकानदारही मनमानी भावाने औषधी विकून आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. एवढेच नाही तर उधारीने औषध देऊन ते दीडपटीने वसूल केले जाते. या प्रकारामुळे फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे, असे असले तरी फवारणीला अळी दादच देत नसल्याने शेतकºयांच्या काळजीत आणखीच भर पडली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.कंपनीवर ठोकणार दावाबीटी कंपन्यांनी अळी येणार नाही, अशा जाहिराती केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेऊन माझ्यासह अनेकांनी कपाशीची लागवड केली असल्याचे शेतकरी आनंदराव जगताप ‘लोकमत’सोबत बोलताना म्हणाले. आता अळींनी कपाशीवर आक्रमण केले आहे. एवढेच नाही तर फवारणीलाही ही अळी मानत नाही. त्यामुळे या विषयावर अनेक शेतकरी एकत्र येत कंपनीविरोधात दावाकरणार असल्याची माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतीशिल शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.बीटीवर अळ्यांनी आक्रमण केले, ही बाब सत्य आहे. परंतु यासाठी शेतकरीही तेवढेच जबाबदार आहे. कपाशी लागवडीच्या नियमानुसार शेतकरी बीटीची लावगड करीत नाही. रेफुजी लागवडीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अळीचा पादुर्भाव वाढला आहे.- किशोर अंबरकरकृषी अधिकारी,पंचायत समिती कळंब