शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

‘बीएसएनएल’च्या खुर्च्या रिकाम्या

By admin | Updated: September 25, 2015 03:13 IST

कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत इंटरनेट क्षेत्रात प्रगती करणाऱ्या भारतीय दूरसंचार विभागाची नेर कार्यालयाची स्थिती दयनीय आहे.

नेर कार्यालय कुलूपबंद : मोबाईल-फोनचे बिल भरण्यासाठी दारव्ह्याचे हेलपाटे किशोर वंजारी  नेरकर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत इंटरनेट क्षेत्रात प्रगती करणाऱ्या भारतीय दूरसंचार विभागाची नेर कार्यालयाची स्थिती दयनीय आहे. गेल्या एक महिन्यापासून या कार्यालयात एकही कर्मचारी हजर नाही. त्यामुळे नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते. हजारो रुपयांची उलाढाल त्यामुळे खोळंबली आहे. वरिष्ठांना मात्र याचे देणे-घेणे नाही. ‘लोकमत’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. नेर येथे बीएसएनएल कार्यालयातील अधिकारी गेल्या चार महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद अद्यापही रिक्तच आहे. अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर या कार्यालयावर एक प्रकारे अवकळाच पसरली आहे. गेल्या १५ दिवसापासून येथील लिपिक प्रशिक्षणासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्याच दिवसापासून या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर विचित्र प्रकारची सूचना लावण्यात आली आहे. ‘संगणक बंद असल्यामुळे येथील काम बंद असून खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, अशी सूचना नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. एक रोजंदारी कर्मचारी असून त्याच्याकडे तक्रारीचे रजिस्टर आहे. आलेल्या तक्रारींची नोंद त्यात करायची एवढेच काम त्याच्याकडे आहे. गेल्या एक महिन्यापासून एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने या कार्यालयाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रिकामे टेबल, बंद संगणक यामुळे येथील विदारक परिस्थितीचे दर्शन घडते. रिकाम्या कार्यालयात माणसांच्या गर्दीपेक्षा कुत्रे आणि बकऱ्या वास्तव्य करतात. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत रिकाम्या खुर्च्याच आढळून आल्या. येथे दोन लाईनमन काम करतात, अशी माहिती मिळाली. हेच दोन कर्मचारी बीएसएनएलचा बाहेरचा डोल्हारा सांभाळतात, असे समजले. मात्र कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित राहात नाही. साधे बिल भरण्याचे कामही या ठिकाणी होऊ शकत नाही. बिल भरण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी थेट दारव्ह्याला जाण्याचा सल्ला देण्यात येतो.अशाच समस्यांनी त्रस्त असलेले एक ग्राहक राजेश गुगलिया यांनी सांगितले की, मी गेल्या १५ दिवसांपासून या कार्यालयात बिलाच्या संदर्भात चौकशीसाठी जात आहे. पण कार्यालयात कुणीच नाही. तर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी केवळ नोंदवून घेण्यापलीकडे आपण काहीही करून शकत नसल्याचे येथील रोजंदारी कर्मचारी म्हणाला.