शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार....

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : वणी उपविभागात कापूस उत्पादकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार संस्थांमधील दलाल शेतकऱ्यांकडून एक ते दीड टक्के दलाली वसूल करीत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.अगोदरच कपाशीचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात आता दलालीचा बोझा सहन करावा लागत असल्याने शेतकºयांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. १०० रुपयांमागे एक ते दीड टक्के दलाली घेतली जात आहे. रोखीच्या व्यवहारात तर दोन टक्के दलाली शेतकऱ्यांवर लादली जात आहे. केवळ गरजेपोटी शेतकरी हा फटका सहन करीत आहेत. गंभीर बाब ही की, या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने दलालांचा कारभार ‘सैैराट’ झाला आहे. नियमानुसार दलालांनी त्यांची दलाली कापूस खरेदीदार व्यापाºयाकडून घेणे अपेक्षित आहे. मात्र काही दलाल व्यापाऱ्यांकडूनही दलाली घेत आहेत, आणि शेतकºयांनाही दलालीच्या नावाखाली लुटत आहेत.यंदा कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कपाशीचे ६० टक्के नुकसान झाले. जेथे एका हंगामात १० ते ११ वेळा कापूस वेचणी व्हायची, तेथे केवळ एका वेचणीने शेत रिकामे झाले. त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कर्ज काढून कापसाचे उत्पादन घेणारे शेतकरी या संकटाने पार कोलमडून गेलेत. हाती आलेला कापूस विकून येईल त्या रकमेत पुढील गरजा भागविण्याच्या मानसिकतेत शेतकरी असताना व्यवस्थेकडून त्यांना नागवले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली असताना, शेतकरी नेते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सीसीआयच्या पारड्यात १०० क्विंटलयंदा शासनाची अधिकृत कापूस खरेदीदार एजन्सी असलेल्या सीसीआयला कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला नाही. परिणामी या हंगामात ९ डिसेंबरपर्यंत सीसीआयला केवळ १०० क्विंटल कापूस खरेदी करता आला. खासगीत शेतकºयांना चांगला भाव मिळत आहे.