शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात बांधलेल्या पुलाला तडे

By admin | Updated: July 21, 2016 00:06 IST

दोन महिनेही पूर्ण न झालेल्या पुलाला तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रस्ता खचण्याचा धोका : रूंदीकरणाच्या कामात गौडबंगाल यवतमाळ : दोन महिनेही पूर्ण न झालेल्या पुलाला तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यवतमाळ ते दारव्हा मार्गाच्या रूंदीकरणाचे काम एका खासगी बांधकाम कंपनीला दिले होते. घाटातील हा रस्ता उन्हाळयात पूर्ण करण्यात आला आणि पावसाळयात या रस्त्याला व पुलाला तडे गेले आहे. कुठल्याही क्षणी या मार्गावर अपघात होण्याचा धोका आहे. या गंभीर प्रकाराच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग कुठली भूमिका घेणार आहे, यावरच प्रवाशांच्या जिवित्वाचे गणित विसंबून आहे. राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम खासगी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. यवतमाळ ते दारव्हा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्याने उन्हाळयात युध्द पातळीवर काम केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रूंदीकरण करून पूल वाढवायचा होता त्या ठिकाणी प्रचंड निष्काळजीपणा करण्यात आला. यामुळे उन्हाळयात बांधलेला पूल पावसाळयात खचण्याच्या स्थितीत पोहचला आहे. इतकेच नव्हे तर या पुलावरील डांबराला चक्क तडे गेले आहे. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी त्यावर डांबर आणि गिट्टी टाकून तडे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही दिवसात आणखी दुसऱ्या बाजूला मोठे तडे गेले आहे. त्यामुळे हा पूल खाली दबला आहे. यामुळे वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागते. हा पूल कुठल्याही क्षणी खचण्याची आणि मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंत्राटदारावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)