शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

दुचाकीचा कट जीवावर बेतला, सख्ख्या भावांनी सूड उगवला

By admin | Updated: March 12, 2017 00:55 IST

ढाब्यावर जेवणासाठी जात असताना दुचाकीचा कट लागून वाद झाला. यात एकाने दुसऱ्याला मारहाण केली.

 ढाब्यावर जेवणासाठी जात असताना दुचाकीचा कट लागून वाद झाला. यात एकाने दुसऱ्याला मारहाण केली. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. मुलाला धोका आहे म्हणून कुटुंबीयांनी त्याला बाहेरगावी कामासाठी पाठवले. दोन दिवसासाठी घरी पाहुणपणाला आलेल्या अक्षयचा सुडाने पेटलेल्या बाक्सा व बोक्या या दोघांनी पाठलाग सुरू केला. घरापासून काही फूट अंतरावर असतानाच अक्षयवर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. यातच तो गतप्राण होवून कोसळला. सूड उगवणारे आता पोलीस कोठडीची हवा खात आहेत. यातील मृतक हा २२ वर्षाचा तर मारेकरी पंचविशीच्या आसपासचे आहेत. आयुष्याच्या सुरुवातीलाच तिघांवर कारागृहात जाण्याची वेळ आली. \ एखादा वाद वेळीच निकालात काढला नाही तर किती भयानक रूप धारण करू शकतो, याचा प्रत्यय घाटंजीतील फोटोग्राफरच्या खुनातून येतो. या घटनेतील मृतक आणि मारेकरी हे चारही जण आपापल्या परीने व्यवसाय उद्योगात रमले होते. कामधंदा आटोपून रात्री ढाब्यावर जेवणासाठी जाताना किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून दोघांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी मृतकाविरोधात मारहाणीचा गुन्हाही दाखल केला. मात्र त्यानंतरही आरोपींचे समाधान झाले नाही. काही करून मारहाणीचा बदला घ्यायचाच या सूडभावनेने यातील अक्षय ऊर्फ बक्सा संतोष मस्कर (२२) हा पेटून उठला. मृतक अक्षय तुषार भोरे (२२) रा.प्रोफेसर कॉलनी हा घाटंजीत फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. मात्र १३ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान दुचाकीचा कट लागल्यावरून झालेल्या वादाने अक्षयचे जीवनच बदलून टाकले. काही क्षणाची घटना शेवटी अक्षयचा जीव घेवूनच शांत झाली. मारहाणीच्या घटनेनंतर अक्षयच्या कुटुंबीयांनी त्याला गावाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेपासून अक्षय अंबेजोगाई येथे खासगी ठेकेदाराकडे कामाला होता. तब्बल सहा महिन्यानंतर तो २४ फेब्रुवारी २०१७ रोजी घरी परत आला. दोन दिवसाच्या पाहुणपणासाठी घरी आल्यानंतर तो जुने वैमनस्य विसरून नेहमी प्रमाणे गावात फिरू लागला. रात्री ९.३० च्या सुमारास गावातून फिरून घराकडे येत असताना घरापासून अगदी काही फूट अंतरावर तिघांनी अक्षयवर हल्ला केला. यात अक्षयचा जागेवरच मृत्यू झाला. अक्षय भोरे याने केलेल्या मारहाणीचा वचपा घेण्यासाठी अक्षय ऊर्फ बक्स संतोष मस्क (२२), त्याचा मोठा भाऊ आकाश ऊर्फ बोका संतोष मस्कर, मित्र चेतन सुखदेव टेकाम तिघेही रा.घाटंजी यांनी कट रचला. घटनेच्या दिवशी दुपारपासूनच हे तिघेही दारूच्या नशेत होते. त्यांनी अक्षय भोरेवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अक्षयला या हालचालीची साधी कुणकुणही लागली नाही. सहा महिन्यापूर्वी झालेला वाद आता निवळला असेल असा समज करून अक्षय गावात वावरू लागला होता. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर तो पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्याच्या बेतात होता. मात्र त्याचा घरापासून काही अंतरावरच घात झाला. आरोपी बक्सा व बोका या दोघांनी अक्षयच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी रॉडने वार केले. तर चेतनने अक्षयला पकडून ठेवले. काही क्षणात झालेले जीवघेणे वार अक्षय सहन करू शकला नाही. त्याने जागेवरच प्राण सोडले. आरडाओरडा होताच परिसरातील मंडळी धावून आली. त्यांनी जखमी अक्षयला ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश भावसार यांनी सुरू केला. अवघ्या १२ तासातच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. घटनेनंतर आरोपी खापरी येथील हनुमान मंदिर परिसरात गेले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड मंदिरामागे लपवून ठेवले. नंतर घाटंजीतीलच एका घराच्या छतावर त्यांनी आश्रय घेतला. पोलिसांनी पहाटे ४.४५ वाजता आरोपी बक्सा याला ताब्यात घेतले. त्यानंतर बोक्या व चेतनलाही पोलिसांनी जेरबंद केले. या तिघांनी गुन्ह्याची कबुली देत सूडातून खून केल्याचे सांगितले. या कारवाईत उपनिरीक्षक नीलेश उरकुडे, गणेश घोसे, उपनिरीक्षक पुप्पुलवार, डोंगरे, सुनील केवट, गणेश आगे, सुनील डुबे, रितेश श्रीवास, मोहन कन्नाके, सुरेश गेडाम आदींनी सहभाग घेतला.