शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांना जागोजागी ‘ब्रेक’

By admin | Updated: December 23, 2015 03:25 IST

सिंचन प्रकल्प मर्यादित कालावधीत पूर्ण होवून नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, हा मुख्य उद्देश आहे. मात्र प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात.

अडथळ्यांची मालिका : निधीअभावी अडली कामे, कित्येक वर्षांपासून निर्माणाधीनचा शिक्काराळेगाव : सिंचन प्रकल्प मर्यादित कालावधीत पूर्ण होवून नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, हा मुख्य उद्देश आहे. मात्र प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात. या प्रक्रियेला कित्येक दिवस, महिनेच नव्हे तर वर्षांचा कालावधी लोटून जातो. जागोजागी लागत असलेल्या ‘ब्रेक’मुळे अनेक प्रकल्प कित्येक वर्षांपासून निर्माणाधीनच आहे.सिंचन विभागाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कामांना मंजूरीसाठी पाच-पाच ठिकाणच्या चॅनलमधून जावे लागते. मंजुरीनंतर पुन्हा त्याच चॅनलमधून ही कामे खालपर्यंत येतात. ठिकठिकाणच्या या चॅनलच्या अडथळ्यांमुळे सिंचन प्रकल्प मंजूर होणे, दुरुस्ती, डागडुजी, सुधारणा आदी कामांमध्ये वेळोवेळी विलंब होतो. कधी-कधी तर एक-एक वर्ष यात निघून जाते. विलंबाने मिळालेल्या मंजुरीमुळे आणि उशिरा मिळणाऱ्या निधीमुळे विविध प्रकल्पाचा मूळ हेतू अनेकदा साध्य होत नाही. खर्चातही वाढ झालेली असते. दरवर्षी लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पाचे कालवे, पाटसऱ्या, लघु पाटसऱ्यांची दुरुस्तीही करावीच लागते. त्यातील माती, गाळ, झाडे, पालापाचोळा काढावाच लागतो. कधी प्रकल्पाची लहान-मोठी दुरुस्तीही करावी लागते. या संदर्भातील प्रस्ताव तालुक्याच्या वा उपविभागामार्फत जिल्हा कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा कार्यालयाकडून जिल्ह्यातील इतर विविध सर्व कामे एकत्रितपणे अकोला येथील पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयाकडे पाठविली जातात. अकोला कार्यालयातून अशाप्रकारचे सर्व प्रस्ताव अमरावती येथील विशेष प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. या कार्यालयाकडून पश्चिम विदर्भातून आलेल्या सर्व जिल्ह्याची कामे एकत्रितपणे विदर्भ विकास सिंचन महामंडळाकडे पाठविली जातात. या मंडळाला शासनाद्वारे वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीच्या प्रमाणात ठिकठिकाणच्या प्रकल्पांना गंभीरतेनुसार, लोकप्रतिनिधींकडून झालेल्या पाठपुराव्यानुसार निधी उपलब्ध करून दिला जातो. कामांना कमीअधिक प्रमाणात मंजूरी दिली जाते. हा प्रवास तिथेच संपत नाही तर परतीचा प्रवासही पुन्हा याच चॅनलद्वारे होतो. यात स्वाभाविकच ठिकठिकाणी विलंब होतो. परिणामी प्रकल्पाची कालमर्यादा वाढत जाते. यातूनच कामाच्या किमतीही वाढत जातात. सिंचन प्रकल्पाची कामे दरवर्षी वेगाने व्हावीत यासाठी यातील अडथळे कमी करून चॅनलची संख्या कमी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)