शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:19 IST

दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली.

ठळक मुद्देदारव्हा उपविभाग : पूल, डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट, पोटकंत्राटदाराची झाली पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वार्षिक निधीतून दारव्हा तालुक्यात कामठवाडा ते वडगाव गाढवे या रस्त्यावरील रपट्यांवर पुलांचे बांधकाम करण्यात आले. निविदा प्रक्रियेनंतर यवतमाळच्या गुघाणे कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट मिळाले. त्यांनी हे काम दारव्हा तालुक्यातील एका खासगी पोटकंत्राटदाराला दिले. त्याने या तांत्रिक कामाचे तुकडे पाडून लेबर काँट्रॅक्टरला दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणारी एजंसी सतत बदलत गेली, तसतसा कामाचा दर्जाही खालावला. बांधकाम विभागाची स्थानिक यंत्रणा केवळ देखरेखीपुरती मर्यादित झाली.निकृष्ट कामामुळे चिकणी येथील पाझर तलावासमोरील पुलाचे काम पहिल्या पावसातच उघडे पडले. बुधवारी रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसात पुलावर मोठा खड्डा पडला. पिचिंग व मुरुम न वापरल्याने आता येथे चक्क वाहन फसू शकेल, अशी स्थिती आहे. चार चाकी वाहन या पुलावरून जाऊ शकत नाही. यावरून पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची ओरड सुरू आहे.सरपंच तक्रार करण्याच्या तयारीतया कामासोबत १२०० मीटर डांबरीकरणही केले गेले. त्याचाही दर्जा सुमार असून गुणवत्ता नियंत्रण व दक्षता विभागाकडून या कामाचे नव्याने मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. दारव्हा उपविभागातील इतरही अनेक कामे याच पद्धतीने केली जातात, अशी ओरड आहे. सखोल तपास झाल्यास गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निकृष्ट कामाबाबत परिसरातील काही सरपंचांनी कार्यकारी अभियंता व आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे.