शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धाडसी सानिका ९८ टक्के गुणांनी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख पचवत ती संस्कृत विषयाचा पेपर सोडविण्यासाठी गेली होती. मुलीने डॉक्टर व्हावे ही सुधाकर पवार यांची इच्छा होती.

ठळक मुद्देसंस्कृतमध्ये १०० टक्के : वडिलांचा मृतदेह शवागारात असताना दिला पेपर

शिवानंद लोहिया ।लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : वडिलांचा मृतदेह शवागारात असताना पेपर सोडविणाऱ्या धाडसी सानिकाने ९७.६० टक्के गुण घेत यश संपादन केले. विशेष म्हणजे, या दु:खद घटनेच्या दिवशी सोडविलेल्या संस्कृत विषयात तिला १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहे. मुलगी डॉक्टर व्हावी, हे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सानिकाची वाटचाल सुरू झाली आहे.हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख पचवत ती संस्कृत विषयाचा पेपर सोडविण्यासाठी गेली होती. मुलीने डॉक्टर व्हावे ही सुधाकर पवार यांची इच्छा होती. त्यादृष्टीने सानिकाने तयारी सुरू केली होती. तिच्या या प्रयत्नाला यश आले. ९७.६० टक्के गुण घेत तिने यश मिळविले. दुपारी निकाल घोषित होताच मिळालेल्या यशाने तिचे अश्रू अनावर झाले.वडिलांचे स्वप्न साकारणारमी डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. परिस्थिती चांगली नसली तरी मला शिकविण्याची पूर्ण तयारी होती. ते जेथे कुठे असतील तेथून मला आशीर्वाद देत असेल. मला डॉक्टर करण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी जीवाचे रान करण्याची तयारी असल्याचे सानिकाने सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल