शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्यांवर मंथन

By admin | Updated: September 22, 2016 01:34 IST

येथील नवजीवन मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी

कल्याणकारी मंडळ स्थापनेची प्रतीक्षा : कुणीच पुढाकार घेत नसल्याची खंतयवतमाळ : येथील नवजीवन मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेच्या मेळाव्यात विविध समस्यांवर मंथन करण्यात आले. सर्व विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विक्रेता फेडरेशनचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर होते. प्रमुख वक्ते म्हणून संजय नाथे, विजय वरफडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त राजेश गुल्हाने, महासचिव बालाजी पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर विक्रेत्यांचे गुणवंत पाल्य रौनक खत्री, पाढेन, शीरपुलवार, रूद्रांश शिरभाते यांचा गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ वितरक रवींद्र पोटे, शिवशंकर चावरे, गुणवंत राऊत, कस्तुरचंद सेठीया, राजू गुजलवार, श्रीपाद तोटे, मदन केळापुरे, अरूण नीत, राजेश काळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राजेश गुल्हाने यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी एकच मंडळ स्थापन्याची प्रक्रिया सुरू असून सेस कुणाकडून वसूल करावा, यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, दिनेश गंधे, मेहमूद नाथानी, विजय वरफडे, नागेश गोरख, विशाल भेदुरकर यांनीही मार्गदर्शन केले. संजय नाथे यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत माहिती दिली. बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विके्रत्यांसाठी लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन, व्यवस्थापन कुणीच काही करीत नसल्याची खंत व्यक्त करून पाल्यांना शैक्षणिक सवलत देण्याची मागणी केली. सुनील पाटणकर यांनी अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या कार्याची माहिती दिली. विक्रेत्यांमधून आजपर्यंत अनेक जण महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. या विक्रेत्यांची कुठेच नोंद नसल्याने त्यांच्या समस्या अद्याप प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी संघटना सतत प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव किरण कोरडे, संचालन सुरेश गांजरे यांनी केले. श्रीराम खत्री यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राजेश निस्ताने, अनिरूद्ध पांडे, गिता तिवारी, सचिन काटे, राजू भीतकर, संदीप खडेकर, गणेश राऊत आदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मनीष अहीर, नितीन भोयर, प्रवीण शिरभाते, प्रदीप आगलावे, प्रदीप नालमवार, सतीश वाघ, संतोष शिरभाते, किरण कोरडे आदींचाही गौरव करण्यात आला. मेळाव्याला वृत्तपत्र विक्रेते नंदू देव, किशोर भेदरकर, दीपक यादव आदीसह सर्व विक्रेत्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)