शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्टा विकताना दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:09 IST

शहरात सध्या टोळीयुद्ध धुमसत असून टोळी सदस्यांकडून अग्नीशस्त्रांची खरेदी केली जात आहे.

ठळक मुद्देअन्टी गँगसेलची कामगिरी : लोहारा एमआयडीसी परिसरातून पाच काडतूसे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सध्या टोळीयुद्ध धुमसत असून टोळी सदस्यांकडून अग्नीशस्त्रांची खरेदी केली जात आहे. परिणामी घातक शस्त्रांचे व्यापारी यवतमाळात ग्राहक शोधण्यासाठी येतात. यातूनच सोमवारी दुपारी बुलडाणा येथून दोन देशी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना टोळीविरोधी पथकाने लोहारा एमआयडीसी परिसरात अटक केली.गजानन भिकाजी ठाकरे (४०), रवींद्र गणेश उमाळे दोघेही रा. टुणकी ता. संग्रामपूर जी. बुलडाणा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. हे दोघे लाल रंगाच्या दुचाकीने येथे देशी पिस्टल व काडतूस विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती अ‍ॅन्टी गँगसेलचे उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. त्यावरून टोळीविरोधी पथकाने एमाआयडीसी परिसरात सापळा रचला. पोलिसांनी दारव्हामार्गे येत असलेल्या या दोन आरोपींची पंचासमक्ष अंग झडती घेतली. त्यात गजानन ठाकरे याच्या कमेरला दोन्ही पिस्टल खोचलेले आढळून आले.हे दोन्ही पिस्टल यवतमाळात विकण्यासाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. या पिस्टलची किंमत एक लाख ६२ हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पीआय संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर, संजय दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे, अमोल चौधरी, किरण पडघण, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, सूरज गजभिये, जयंत शेंडे, राजकुमार कांबळे, श्रीधर शिंदे, आकाश मसनकर, सतीश सिडाम, शशिकांत चांदेकर, शंकर भोयर, राहुल जुंकटवार, गौरव ठाकरे यांनी केली.