शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यानेच केली चिमुकल्याची हत्त्या

By admin | Updated: February 26, 2017 01:11 IST

तालुक्यातील सातघरी येथे जन्मदात्यानेच आपल्या चार वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्त्या केल्याचे उघडकीस आले.

सातघरीची घटना : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, ‘पीएम’ने बिंग फोडले महागाव : तालुक्यातील सातघरी येथे जन्मदात्यानेच आपल्या चार वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्त्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धीरज किशोर जाधव, असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे वडील किशोर गोविंद जाधव (३५) हे सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. किशोर आणि पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते. भांडणात शेजारी मध्यस्थी करीत होते. मध्यस्थीनंतर कसा तरी त्यांचा वाद क्षमत होता. मात्र त्यांचा वाद कायमस्वरूपी निकाली निघालाच नाही. किशोर सतत पत्नीला चारित्र्यावरून छळत होता. या दाम्पत्याला धीरज नामक चार वर्षीय चिमुरडा होता. मात्र हा मुलगा आपला नाही, असे म्हणून किशोर नेहमी पत्नीशी भांडत होता. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास किशोरने घरीच गळा आवळून चिमुरड्या धीरजची हत्त्या केली. यावेळी त्याची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेली होती. संशयाच्या भूताने पछाडलेला किशोर धीरजची हत्त्या केल्यानंतर अगदी आरामात काळी दौ. येथे बाजारासाठी गेला. सायंकाळी तो परत आला. परत येताना त्याने धीरजसाठी कपडे व खाऊसुद्धा आणला. यावेळी शेतातून परतलेल्या पत्नीने धीरजला उठविण्याचा प्रयत्न केला असता तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. लगेच त्याला काळी येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी किशोरच्या पत्नीनेच महागाव पोलिसांकडे मुलाचा खून पतीनेच केल्याची तक्रार दिली. तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून किशोरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)