शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील दारू दुकानदार ‘खूश’

By admin | Updated: January 28, 2015 23:40 IST

चंद्रपुरातील दारूबंदीमुळे या जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि राळेगाव तालुक्यातील दारू दुकानदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या तिनही तालुक्यात आता

के.एस.वर्मा - राळेगावचंद्रपुरातील दारूबंदीमुळे या जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि राळेगाव तालुक्यातील दारू दुकानदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या तिनही तालुक्यात आता चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यशौकीनांची गर्दी वाढणार आहे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर येत असलेला अनुभव लक्षात घेता ही बाब स्पष्ट आहे. दरम्यान, चंद्रपुरातील दारू दुकाने यवतमाळ जिल्ह्यात स्थानांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.वर्धा जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तालुक्यातील वर्धा जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेल्या अनेक गावात दारू दुकाने, बियर बार अघडले गेले. या दुकानांमध्ये पूर्वीच्या तुलनेत ग्राहकी आणि दारूविक्री वाढली. विक्रेते मालामाल झाले. आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होत आहे. त्यामुळे सीमारेषेवरील यवतमाळ जिल्ह्यातील गावांमध्येही दुप्पट किंवा त्यापेक्षाही अधिक गर्दी वाढणार आहे. विक्री वाढून दुकानदारांची कमाई अनेक पटीने वाढणार आहे. नवीन दुकाने या क्षेत्रात वाढण्याची शक्यताही नाकारत येत नाही.दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडा या मागासलेल्या भागाचा अभ्यास करून केळकर समितीने सादर केलेल्या आपल्या अहवालात यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दारू हेही एक कारण असल्याचे नमूद करत जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीची शिफारस केली आहे. समितीने सादर केलेल्या अहवालावर करावयाच्या कारवाईसाठी गठित समितीचे प्रमुख महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रबळ लिकर लॉबीचा विरोध झुगारून, त्यांचा विरोध पत्करून या जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. तेच मंत्री या समितीच्या अहवालावर अंतिम निर्णयाची शिफारस करणार असल्याने यवतमाळ जिल्ह्यातही दारूबंदीची अपेक्षा वाढली आहे.