शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

बोंडअळी मदतीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:58 IST

संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शासनाने ३० ते ३७ हजार रुपयांच्या हेक्टरी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मिळण्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देशासनाचा वाटा हेक्टरी ६८०० : बियाणे कंपन्या न्यायालयाच्या वाटेवर

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शासनाने ३० ते ३७ हजार रुपयांच्या हेक्टरी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मिळण्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. निकषानुसार शासनाचा वाटा हेक्टरी ६८०० रुपये आहे. तर दुसरीकडे बियाणे कंपन्या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. परिणामी कर्जमाफी प्रमाणेच बोंडअळीग्रस्तांच्या मदतीचे होणार आहे.यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले. विदर्भात सुमारे ४० लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. मदतीसाठी शेतकऱ्यांनी आवाज उठविला. विरोधकांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारला मदत देण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोंडअळी नुकसानीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपये मदतीची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदत येईल तेव्हा नुकसानग्रस्त शेतकºयांचा भ्रमनिरास होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या (एनडीआरएफ) निकषानुसार शासनाचा वाटा ६८०० रुपये एवढा आहे. इतर वाटा हा बियाणे कंपन्या आणि विमा कंपन्यावर सोपविण्यात आला आहे. त्यातही दोन हेक्टरपर्यंतच मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले तरच शेतकरी मदतीस पात्र ठरतो. परिणामी अनेक शेतकरी या निकषामुळे मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.बोंडअळी नुकसानीसाठी पीक विम्यातून आठ हजार रुपये कापूस उत्पादकांना दिले जाणार आहे. त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला त्यांनाच गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ज्यांनी विमाच उतरविला नाही, असे अनेक शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही हाही संभ्रम निर्माण झाला आहे. कापूस नियंत्रण कायद्यानुसार बियाणे कंपन्यांकडून १६ हजार रुपये मदत दिली जाते. राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्य शासन, बियाणे कंपन्या आणि विमा कंपनी अशा तिघांकडून एकत्रित मदत ३० ते ३७ हजार रुपये मिळणार आहे. परंतु अनेक बियाणे कंपन्या शासन निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. परिणामी १६ हजार रुपये मदतीवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.एकंदरित शासनाने मदतीची घोषणा केली. परंतु विविध निकष आणि कंपन्यांमुळे ही मदत शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागणार आहे. कर्जमाफीचे पैसे खात्यात येण्यासाठी सहा महिने लागले, तेही संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. आता बोंडअळीग्रस्तांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हेही महत्वाचे आहे.बियाणे कंपन्यांनी केले हात वरबियाणे कंपन्यांची जबाबदारी उगवणशक्ती आणि बियाण्यांची शुद्धता येथपर्यंतच मर्यादित आहे. यासोबत तंत्रज्ञानाची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. प्रत्येक बियाण्यांच्या पॉकीटवर बीटी तंत्रज्ञानाची रॉयल्टी घेतली आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी आम्ही जबाबदार कसे असे म्हणत कंपन्यांनी सुरुवातीलाच हातवर केले आहे.

टॅग्स :cottonकापूस