शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

घाटंजीच्या विकासाला खीळ

By admin | Updated: August 10, 2015 02:15 IST

शहरात प्रलंबित असलेल्या विकास कामांची यादी लांबलचक आहे. मात्र आर्थिक मलिदा मिळणाऱ्या कामांकडेच नगरसेवकांचे लक्ष असून, इतर कामांवर दुर्लक्ष केले जात आहे.

नगरसेवकांचे दुर्लक्ष : केवळ मलिदा मिळणाऱ्या कामांवरच जोरघाटंजी : शहरात प्रलंबित असलेल्या विकास कामांची यादी लांबलचक आहे. मात्र आर्थिक मलिदा मिळणाऱ्या कामांकडेच नगरसेवकांचे लक्ष असून, इतर कामांवर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.नगरपरिषद कार्यालयात गेल्यानंतर नगराध्यक्षांचे एकच तुणतुणे ऐकायला मिळते, ते म्हणजे ‘माझे कुणीही ऐकत नाही, त्याला मी काय करू?’, माझे किती, तुझे किती यावरच सातत्याने खल सुरू असतो. मार्च एन्डींगच्या सुमारास कोट्यवधी रुपये परत गेले. जी कामे झाली ती केवळ ठेकेदारांच्या नावावर घेतल्या गेलेली कामे होती. तीही नगरसेवकांनी स्वत:च वाटून घेतली होती. पूर्वी कामाचे कामिशन नगरसेवक स्वत:च्या खिशात टाकायचे. परंतु, आता ठेकेदाराला कमिशन देऊन कामे नगरसेवकच करतात. अशावेळी संबंधित कामाचा दर्जा कोण तपासणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. नगरपरिषदेचे अभियंतेही राजकीय दबावाखाली बांधकामाची गुणवत्ता तपासत नाही. डोळे मिटून बिल काढले जाते. मुख्याधिकारीही सतत दडपणाखाली वावरतात. त्यामुळे त्यांनीही बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागील वर्षी सिमेंट काँक्रीट रोड व नाल्या तसेच रिटेनिंग वॉलच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत नगरपरिषदेकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. वरिष्ठांनी या तक्रारींची दखल घेऊन कामांच्या दर्जाची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात आवश्यक असलेल्या कामांकडे नगरसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहराचा मुख्य रस्ताच प्रचंड उखडलेला आहे. त्यातून अपघातही वाढलेले आहे. अपघातामध्ये आतापर्यंत दोन जीवही गेले. परंतु रस्त्याची निविदा काढून बराच कालावधी लोटला तरी ‘सेटिंग’ न जुळल्याने काम सुरू झालेले नाही. या रस्त्याबाबत नागरिकांमधून ओरड वाढत आहे. मात्र नागरिकांच्या आक्रोशालाही नगरसेवक किंमत देईनासे झाले. घाटंजी शहराला वाघाडी धरणावरून पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. फुटलेल्या पाईपलाईनमधून अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. घनकचरा व्यवस्थापनावर लाखो रुपयांचा ठेका दिल्या गेला, परंतु प्रकल्प नेमका कुठे आहे याचा नागरिकांना पत्ता लागू शकला नाही. कचरा उचलण्याचे कंत्राट एकदम तिपटीने कसे काय दिले?, वृक्ष लागवडीचा निधी, पावसाळी कामासाठी आलेला आकस्मिक निधी, रोगराई निर्मूलनासाठी फवारणी यंत्रे खरेदी व दुरूस्ती तसेच इतर किरकोळ बाबींवरील पैसा जातो कुठे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)