शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्याच्या धाकावर बोलेरो वाहन पळविले

By admin | Updated: August 31, 2014 00:07 IST

धनोडा टी-पॉइंटवर असलेल्या हॉटेल व्यावसायीकावर क्षुल्लक कारणातून अज्ञात पाच ते सहा युवकांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर बोलेरो गाडीच्या चालकाला देशीकट्ट्याचा धाक दाखवून या

महागाव : धनोडा टी-पॉइंटवर असलेल्या हॉटेल व्यावसायीकावर क्षुल्लक कारणातून अज्ञात पाच ते सहा युवकांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर बोलेरो गाडीच्या चालकाला देशीकट्ट्याचा धाक दाखवून या आरोपींनी यवतमाळच्या दिशेन पलायन केले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता धनोडा फाट्यावर घडली. अतुल नारायण दरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी या अज्ञात युवकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पाच ते सहा आरोपी हे नांदेडवरून यवतमाळ येथे जात होते. दरम्यान चहा घेण्यासाठी धनोडा येथे थांबले असताना तेथील हॉटेल व्यवसायिक नारायण दरणे यांना त्यांनी यवतमाळच्या तिकीटची विचारपूस केली. तेवढ्यात नांदेडवरून आलेल्या नव्या कोऱ्या क्रमांक नसलेल्या बोलेरो गाडीचा चालकसुद्धा चहा घेण्यासाठी तेथे थांबला. यावेळी तिकीटाच्या क्षुल्लक कारणावरून भडकलेल्या अज्ञात आरोपींनी दरणे यांना शिविगाळ करणे सुरू केले. दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू असताना दरणे यांच्या मुलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी अतुल दरणे यांच्या पोटावर चाकूचा वार केला. हा वार दरणे यांनी चुकविला. परंतु झटापटीत चाकू त्यांच्या मांडीवर लागला. यातील एकाने देशीकट्टा काढून धमकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चाकू व देशी कट्टा निघाल्याने तेथे उपस्थित सर्वच जण घाबरले. तेवढ्यात आरोपींनी बोलेरो गाडी चालकास चाकूचा धाक दाखवून त्याचे वाहन यवतमाळच्या दिशेने नेण्यास त्याला भाग पाडले. याप्रकरणी दरणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक ठाणेदार सचिन चरडे आरोपींचा शोध घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)