शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

बोगस डॉक्टरांकडून चष्मे विक्रीचा गोरखधंदा

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा

सुधाकर अक्कलवार ल्ल घाटंजी घाटंजी : तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्रथमत:च निसर्गाच्या लहरीपणाने मेटाकुटीस आलेल्या ग्रामीण रुग्णांच्या जिवाशी बाहेर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर येऊन फसगत करत आहे. कोणतीही शासकीय आरोग्य विभागाची परवानगी नसताना खेडोपाडी जाऊन स्थानिक एखाद्या इसमाला हाताशी धरून खुलेआम शिबिर लावून त्यात मनमानी तपासणी फी आकारत आहे. त्यानंतर चष्म्याची आवश्यकता आहे असे सांगत वाटेल तसे ३०० ते ६०० रुपयापर्यंत चष्मा घ्यावयास भाग पाडत आहे. यात ग्रामीण जनतेची चांगलीच फसगत झाल्याची चर्चा असून आरोग्य विभाग मात्र गप्प बसले आहे. तालुक्याबाहेरील आकपुरी, येळाबारा येथे हा गोरखधंदा चालविल्यानंतर या टोळीने घाटंजी तालुक्यातील हिवरधरा, मोवाडा, किन्ही येथे शिबिर घेतले. या दरम्यान चांगलीच रुग्णांची फसगत झाल्याची चर्चा असून कोणत्याही प्रकारची पक्की पावती देत नसल्याचे बोलल्या जात आहे. नेत्र हा मानवी शरीराचा गरजवंत अवयव असतानासुद्धा आम्ही एका संस्थेकडून जनसेवा करीत असल्याची बतावणी करीत खुलेआम ग्रामीण जनतेचा पैसा उकळत आहे. तर बहुतांश रुग्णांकडून तुमच्या नंबरचा चष्मा बनवून आणतो असे सांगून अ‍ॅडव्हांस पैसे काढून नेत आहे. या बाबत काही सुज्ञ नागरिकांनी विचारले असता ते आपल्या खास शैलीत सांगून आम्हाला आपण विचारणार कोण, आम्हाला वरिष्ठांची परवानगी आहे. आपण आम्हाला अडथळा निर्माण केल्यास महागात पडेल असे बोलत असल्याचे सुज्ञ नागरिक फालतू भानगडीत का पडायचे या विवंचनेत वावरत असल्याने या बोगस डॉक्टरांचा चांगलाच जम बसला असून हा प्रकार नेमका काय असावा या बाबत खुलासा करण्यास दुजावत आहे. या शिबिरादरम्यान आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नसल्याने या शिबिरावर शंका निर्माण झाली असून अशा बोगस डॉक्टरांची शहानिशा करणे गरजेचे आहे. यावर आरोग्य विभाग लक्ष पुरवतील काय, अशी जनमाणसात चर्चा होत आहे. गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे टोळके त्यांची फसवणूक करीत आहे. त्याबाबत प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे.