शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:43 IST

तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देटरबूज बियाण्यांचा दगा : चार गावातील शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.टरबूज पिकाला अल्प फुल व जी फळे आलीत ती वाकडीतिकडी आढळून आली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन व नियोजन करुनही या दोषाचे प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निर्देशनास आले.निंबी पारडी, भोजला ही तीन गावे टरबुजच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहे. चांगल्या गुणवत्ता पूर्ण टरबुजाचे पीक गावातील शेतकरी घेतात. परंतु यावर्षीच्या संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे. या बोगस बियाण्याला एकूण २२ शेतकरी बळी पडलेले आहे. या बोगस बियाण्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याने शेतकरी चिंतातुर व अस्वस्थ झालेला आहे.शेतकºयांच्या नुकसानीची कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर बियाणे कंपनीकडून लागवड खर्च व येणारे उत्पन्न वसूल केले जाईल, असे आश्वासन किशोर तिवारी यांनी शेतकºयांना दिले. यावेळी तिवारी यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या सोबत चर्चा केली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून तातडीने दखल घेऊन शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, विलंब झाल्यास हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनीष जाधव यांनी दिला. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील हे बोगस बियाणे, किटकनाशकची मालिका थांबायचे नाव घेत नाही. संबंधित यंत्रणाच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप मनीष जाधव यांनी केले आहे .यावेळी एसडीओ नितीन हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, तालुका कृषी अधिकारी धुळधुळे, गटविकास अधिकारी गवई, तालुका कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, प्रा.महादेव गावंडे, संजय कुंभारे, हेमंत ठाकरे, निखिल ठाकरे, विजय राऊत, भालचंद्र पेन्शनवार, जिजाबाई गावंडे , विशाल ठाकरे, गजानन ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.