शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संकटमोचन परिसरात तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: August 12, 2016 02:04 IST

येथील बांगरनगरातील तरुणाच्या खुनाची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून तर दुसऱ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला.

यवतमाळात खुनाची मालिका : एक जण गंभीर, दोघांना अटक यवतमाळ : येथील बांगरनगरातील तरुणाच्या खुनाची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून तर दुसऱ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला. एकाच आठवड्यात झालेल्या खुनाच्या दोन घटनांनी यवतमाळ शहर हादरले आहे. दरम्यान या खुनातील दोन आरोपींना वडगाव रोड पोलिसांनी अटक केली आहे. अमित दीपक पलटनकर (२६) रा. संकटमोचन परिसर उमरसरा असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आशिष ज्ञानेश्वर पलटनकर (२९) रा. संकटमोचन परिसर असे जखमीचे नाव आहे. अमित आणि आशिष हे दोघे चुलत भाऊ असून त्यांचा संकटमोचन परिसरात पानठेल्याचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास आरोपी नाना अंकुश रोडे, मयूर उर्फ चिनी पुसनाके, संजय उर्फ बारक्या दत्ता शिंदे, संजय उर्फ जांग्या प्रकाश कालनकर सर्व रा. उमरसरा यांनी अमितला मारहाण सुरू केली. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी मारहाण करण्यात आली. त्यावेळी आशिष पलटनकर भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या हातावर एकाने चाकूचा वार केला. तर इतरांनी आशिषला बेदम मारहाण केली. फर्शी, कुंडी उचलून अमितच्या छातीवर आदळली. एवढेच नाही तर चाकूनेही भोसकले. यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी आशिषने अमितला एका आॅटोरिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. नागपूरला नेत असताना वाटेतच अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी आशिष पलटनकर याच्या तक्रारीवरून सुरुवातीला वडगाव रोड पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविला होता. मात्र आता अमितच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर वडगाव रोडच्या शोध पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी उमरसरा परिसरातच दडून असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी पथकातील नीलेश राठोड यांच्या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, रावसाहेब शिंदे, सुरेश मेश्राम, आशिष चौबे, गौरव नागलकर यांनी आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी संजय उर्फ बारक्या शिंदे आणि संजय उर्फ जांग्या कालनकर या दोघांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार देवीदास ढोले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. मृत अमित पलटनकर याच्यावरही पोलीस दप्तरी गुन्हे आहेत. काही दिवसापूर्वी त्याला तलवारीच्या बळावर दहशत पसरविताना अटक करण्यात आली होती. (कार्यालय प्रतिनिधी)