जवळा : आर्णी तालुक्यातील जवळा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राहुल मुजमुले व आशिष निरपासे मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात सगळीकडे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राहुल मुजमुले व आशिष निरपासे मित्र परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक आशिष पाटील यांनी शिबिराला आर्थिक सहाय्य केले. आशिष पाटील व त्यांच्या पत्नी रजनी पाटील यांनी रक्तदान करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला.
आर्णी येथील विशाल मुरादे यांनीही रक्तदान केले. शिबिरात एकूण २७ दात्यांनी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राहुल मुजमुले, आशिष निरपासे, अन्सार शेख, आलम पठाण, सूरज गावंडे, पंकज धाये, पिंटू धाये, संतोष मूर्खे, चंद्रसेन भगत, प्रदीप नाईक आदींनी परिश्रम घेतले.