यवतमाळ : लोकमतचे संस्थापक-संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो पथक, लोकमत परिवार आणि प्रेरणास्थळ आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बाबूजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. गोरगरीब गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी सदर शिबिर आयोजित आहे. रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी सहकार्य करणार आहे. या शिबिरात यवतमाळ शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रेरणास्थळ आयोजन समिती, लोकमत परिवार आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. अधिक माहितीसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार (७७०९९९४२७६), प्रा.पद्ममिनी कौशीक (९८२३२८२३७२) यांच्याशी संपर्क साधावा. (वार्ताहर)
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By admin | Updated: July 2, 2015 02:46 IST