शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अंधत्व निवारण अधिकारी शिवसेनेच्या दावणीला

By admin | Updated: August 7, 2014 00:03 IST

शासनाच्या अंधत्व निवारण कार्यक्रमाचे येथील प्रमुख अधिकारी चक्क शिवसेनेच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सेनेच्या आमदाराला खूश

यवतमाळ : शासनाच्या अंधत्व निवारण कार्यक्रमाचे येथील प्रमुख अधिकारी चक्क शिवसेनेच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सेनेच्या आमदाराला खूश करण्यासाठी या अधिकाऱ्याने दिग्रस-दारव्हा-नेर या विधानसभा मतदारसंघातच सर्वाधिक नेत्र तपासणी शिबिरे घेतल्याचे उघड झाले आहे. शासनामार्फत अंधत्व निवारण कार्यक्रम राबविला जातो. गोरगरीब नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया या योजनेतून केली जाते. त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी, औषधी व चष्म्याचा साठा उपलब्ध करून देते. नियमानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात समान पद्धतीने ही नेत्र तपासणी शिबिरे घेणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात ती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार संजय राठोड यांच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघातच मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. त्यासाठी अंधत्व निवारण कार्यक्रम यवतमाळचे प्रमुख डॉ. राजेश पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पवार हे आमदाराचे नातेवाईक असल्याने जणू शासनाची योजना त्यांनी दिग्रस मतदारसंघातच तारण ठेवली की काय, अशी शंका येऊ लागली आहे. आमदारांना खूश करण्यासाठी पवार यांनी गेल्या दोन महिन्यात दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यातील गावागावात नेत्र तपासणी शिबिर राबविण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी बॅनर मात्र शिवसेनेचे वापरले जात आहे. या शिबिरांमध्ये नेत्र तज्ञांची ड्युटी लावली जात असल्याने आर्णी रोड स्थित आयुर्वेद महाविद्यालयातील ओपीडी व डोळ्यांचे शिबिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी येणारा औषधी व चष्म्यांचा साठा दिग्रस या एकाच मतदारसंघात वितरित करण्याचा पराक्रम डॉ. पवार यांनी केला आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आणि एक राष्ट्रवादीचे असतानासुद्धा एकही जण शिवसेनेसाठी शासकीय निधीतून सुरू असलेल्या या उधळपट्टीबाबत ब्र काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेतून अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना वंचित ठेवले गेल्याचेही सांगितले जाते. शासकीय योजनेतून औषधी व डिझेलवर वारेमाप खर्च केला जातो. अंधत्व निवारण कार्यक्रमासाठी असलेले वाहन विनाकारणच दारव्हा-यवतमाळ येरझारा मारत असल्याचे सांगण्यात येते. त्यावरील शासनाचा डिझेलचा खर्च व्यर्थ ठरतो. याबाबत डॉ. राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुकानिहाय झालेल्या नेत्र शिबिराची माहिती देणे हेतुपुरस्सर टाळले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखाडे यांच्या कार्यालयातून काही माहिती देण्यात आली. यावर्षी शासकीय यंत्रणेला पाच हजार २५ व स्वयंसेवी संस्थांनासुद्धा तेवढ्याच नेत्र शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या एका रुग्णावर एक हजार रुपये खर्च केला जातो. त्यासाठी तीन डॉक्टर आहेत. नेत्र शस्त्रक्रियेसाठी २० हजार १०० रुग्णांची नोंद झाली असून जुलै अखेर तीन हजार ७१९ शस्त्रक्रिया पार पडल्या. यातील बहुतांश शस्त्रक्रिया दिग्रस विधानसभा मतदारसंघातील रुग्णांवर झाल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)