शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

राळेगावात प्रस्थापितांविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट

By admin | Updated: October 19, 2014 23:18 IST

राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा. वसंत पुरकेविरुद्धच्या जबर असंतोषाचा स्फोट झाला आहे. या मतदारसंघाचे २० वर्षांपर्यंत सलग प्रतिनिधित्व करणारे प्रा. पुरके यांचा पराभव त्यांचेच गत तीन

के.एस. वर्मा ल्ल राळेगावराळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा. वसंत पुरकेविरुद्धच्या जबर असंतोषाचा स्फोट झाला आहे. या मतदारसंघाचे २० वर्षांपर्यंत सलग प्रतिनिधित्व करणारे प्रा. पुरके यांचा पराभव त्यांचेच गत तीन निवडणुकीत प्रतिस्पर्धी राहिलेले प्रा.डॉ. अशोक उईके यांनी तब्बल ३८ हजार ७५० मतांनी पराभव केला. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले. प्रा. पुरके यांचे राजकारणातील सर्व विरोधी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, मतदार एवढेच नव्हे तर त्यांच्याच काँग्रेसमधील असंतुष्टांनी एकजूट करून सर्व जुना हिशेब चुकता केला. पुरकेंना पराभूत करायचेच या भावनेने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र २००९ च्या निवडणुकीत दगा करणाऱ्यांनाही या निवडणुकीत धडा देण्यात उईके यशस्वी ठरले. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. उईके यांना २२४ तर पुरके यांना ११५ मते बॅलेट पेपरमध्ये मिळाल्याचे दिसल्याने नोकरदारवर्गही भाजपासोबत असल्याचे दिसून येत आघाडीची सुरुवात झाली. बाभूळगाव तालुक्यातील इव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीतच दोन हजार २८६ मतांची आघाडी भाजपला मिळाली. यानंतर बाभूळगावच्या सहा, कळंबच्या सात, राळेगावच्या आठ, रूंझा महसूल सर्कलच्या चार याप्रमाणे २५ फेऱ्यांपर्यंत सतत आघाडी कायम वाढतच राहिली. दुपारी २ वाजता या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोहन जोशी, निवडणूक विभागाचे निरीक्षक टी.कैथिरेसन, सहायक योगेश लाखाणी, तहसीलदार सुरेश कव्हळे आदींनी प्रा. अशोक उईके यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले. सकाळच्या पहिल्या फेरीपासून विजयाची चाहुल लागताच भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल-नीळ उधळून आनंद व्यक्त केला. फटाके फोडणे सुरू केले. ढोलताशाच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मतदारसंघात भाजप नेत्यांच्या झालेल्या सभा आदी कारणांमुळे हा परिसर भाजपला अनुकूल झाला. पाच वर्षांत भाजपने या मतदारसंघात संघटनेचे जाळे कुशलतेने विणले. विविध समाजाच्या लोकांना पक्षाकडे वळविण्यात भाजपच्या वरिष्ठांना यश आले. एकनिष्ठ कार्यकर्ते, नेते आदी बाबींमुळे प्रा. उईके यांचा विजय सुकर झाल्याचे यावेळी दिसून आले. प्रा. पुरके यांचे मात्र या निवडणुकीत कवडीचेही सुयोग्य नियोजन नव्हते. जुन्या, एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. धड एक मोठी सभाही ते आयोजित करू शकले नाही. याशिवाय बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आदी बाबींकडे दुर्लक्ष केल्यानेही प्रा. पुरके यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन टर्मच्या तुलनेत शेवटच्या दोन टर्ममध्ये पुरके यांचे या मतदारसंघाकडे बरेच दुर्लक्ष झाले होते.