शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील चातारीत चाखायला मिळणार ‘काळा गहू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 15:15 IST

काळ्या गव्हाचा हा प्रयोग केला आहे, भाऊराव धात्रक नामक शेतकऱ्याने. सध्या बहरात आलेला हा गहू पाहण्यासाठी विदर्भ मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी चातारी शिवारात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देनवीन पीक पाहण्यासाठी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची धावशेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

दतात्रय देशमुख

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : एकीकडे विदर्भातील शेतकरी घटणाऱ्या उत्पन्नामुळे आत्महत्येसारखा घातक मार्ग पत्करत आहेत. तर दुसरीकडे याच विदर्भातील अनेक शेतकरी उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोगही करीत आहेत. असा एक प्रयोग उमरखेड तालुक्यातील चातारी शेतशिवारात करण्यात आला आहे. काळ्या गव्हाचा हा प्रयोग केला आहे. भाऊराव धात्रक नामक शेतकऱ्याने. सध्या बहरात आलेला हा गहू पाहण्यासाठी विदर्भ मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी चातारी शिवारात धाव घेतली आहे.

चातारी येथील शेतकरी भाऊराव धात्रक हे याअगोदर राज्यात विविध ठिकाणी तालुका कृषी विभागामार्फत पीक पाहणी अभ्यास दौऱ्यात नेहमीच अग्रेसर राहिले. शेतकर्‍यांनी रासायनिक खत टाळून शेत जमिनीचा पोत कायम राहाण्यासाठी गांडूळ खत उत्पादित करून शेतीला सेंद्रिय खताची जोड द्यावी, असे त्यांचे मत आहे. त्याच दृष्टिकोनातून भाऊराव धात्रक यांनी प्रथमच काळ्या गव्हाच्या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर एक एकरात पेरणी केली.

पीक जसजसे वर येऊ लागले तसतसे अन्य शेतकऱ्यांमध्ये या पिकाविषयी उत्सुकता वाढली. हा गहू मानवी शरीराला कितपत उपयोगी आहे, याविषयी इतर शेतकरी धात्रक यांच्याकडे येऊ लागले. हा गहू आपणास मिळावा म्हणून काही जणांनी मागणी करून ठेवली आहे. या वाणाचा गहू एकरी १५ ते ३५ क्विंटल उत्पादित होऊ शकतो, असे भाऊराव धात्रक सांगतात.

वाढत्या खर्चाने शेतकरी खचले आहेत. परंतु, शेती साेडून देता येत नाही. त्यावरच संसाराचा गाडा अवलंबून आहे. म्हणून मी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून वेगवेगळे वाण पेरणी करतोय. प्रथमच काळ्या गव्हाचे वाण घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

- भाऊराव धात्रक, शेतकरी, चातारी

टॅग्स :agricultureशेती